Bulldozer Politics : यूपी पॅटर्न उद्योगनगरीत? आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा इशारा

UP Bulldozer Pattern : पिंपरी-चिंचवडमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादी उतरताच भाजपने दिला हा थेट कडक इशारा...
MLA Mahesh Landge
MLA Mahesh LandgeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : उद्योगनगरीतील (रावेत कॉर्नर) नौशाद शेख याने आपल्या क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.

सध्या हे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये गाजते आहे. शेखला फाशी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिस आय़ुक्तांकडे केल्यानंतर भाजपही या प्रकरणात उतरली असून, त्यांनी शेखच्या घरावर बुलडोझर चालविण्याचाच कडक इशारा दिला आहे. (Bulldozer Politics)

शेखच्या बिल्डिंगवर बुलडोझर चालवून जशास तसं उत्तर देणार आहे, असे भाजपचे (BJP) भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांनी सांगितले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, असे ते म्हणाले. अशा घटनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यात कठोर कारवाई झाली नाही, तर त्यातील आऱोपींची ताकद वाढते. आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, असा त्यांचा गैरसमज होतो. म्हणून अशा वृत्ती शहरात टिकू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

MLA Mahesh Landge
Sharmila Thackeray News : यावेळी लोक 'ती' चूक करणार नाहीत..! असं का म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

हिंदू समाज, पिंपरी-चिंचवडने याप्रश्नी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लांडगे अत्यंत संतप्त आणि आक्रमक झाल्याचे दिसले, तर शेख या नराधमाची केस कोणीच घेऊ नये, असे आवाहन भाजपच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी या वेळी वकिलांना केले. त्याचवेळी जर कोणी ती घेतली, तर त्या वकिलांचे काय करायचे ते आम्ही बघू, असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला. चिंचवडच्या आमदार अश्विनी जगतापही या वेळी उपस्थित होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेख याने 2014 मध्येही आपल्याच संस्थेतील लोणावळ्यातील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याच्या अत्याचाराला आणखी काही मुली बळी पडल्याची भीती आहे. त्याच्या संस्थेत शिकणाऱ्या मुलींचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना इस्लाममध्ये धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जात होते का? त्यांना अवैध मार्गाला लावले जात आहे का, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करण्याची आणि त्याची ही अकादमीच बंद करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

MLA Mahesh Landge
Sharad Mohol Case : मोहोळ खून प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक, सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com