Sharmila Thackeray News : यावेळी लोक 'ती' चूक करणार नाहीत..! असं का म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

MNS contest the Loksabha elections : मनसे लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यापासून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे राजकीय विषयांवर भाष्य करताना दिसत आहेत.
Sharmila Thackeray
Sharmila ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु आहे. नेत्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांवर जोर धरला आहे. बैठकांचा सपाटा सुरु असून सार्वजनिक तसेच खासगी कार्यक्रमांना नेते हजेरी लावताना दिसून येत आहेत. त्यातच आता नेत्यांच्या पत्नींनी निवडणुकीच्या मैदानात पाऊल ठेवल्याचे दिसून येते.

त्यांनी कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे राजकीय भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. यातून राजकीय भाष्य करत सातत्याने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. काल पुणे येथील कोंढव्यात झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली.

Sharmila Thackeray
BJP Maharashtra: ...तर मोदी,शाह अन् फडणवीसांनाही काँग्रेस सरकारचे लाभार्थी म्हणावं का?

पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले होते. त्या म्हणाल्या, “आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार होते, आपण एवढी कामं केली, पण लोकांनी मतदानावेळी चूक केली. पण यावेळी लोक चूक करणार नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुमच्या फोनवर उपलब्ध असलेले चांगले उमेदवार आहेत. हे उमेदवार तुमची कामं पटापट करतात. त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवा. त्यांना नक्कीच मला वरच्या स्तरावर बघायचं आहे”. त्या पुढे म्हणाल्या, “मार्च- एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील. मग ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात".

उद्धव ठाकरेंवर टीका

कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी काम केलं तेवढी कामं कोणत्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. आपला पक्ष रस्त्यावर होता. आपली चांगली चांगली पोरं कोविडमध्ये दगावली. तरीही मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी चांगली कामं करतोय तर तुमचा कृपाशिर्वाद असाच राहुदे”, असंही आवाहन त्यांनी केले.

Sharmila Thackeray
Uddhav Thackeray On Barsu : उद्धव यांची ‘रिफायनरी’ भूमिकेवर पुन्हा एकदा अळीमिळी गुपचिळी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com