Uddhav Thackeray Sabha News : आम्हांला नकली म्हणालात, पण शिवसेनेचा दणका काय असतो, ते 4 जूनला निकालातून कळेल

Solapur Loksabha Election 2024 : हिंमत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात लावून दाखवाच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या सभांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला होता.तसेच नकली शिवसेना म्हणत त्यांना डिवचलंही होतं. पण आता ठाकरेंनी मोदींच्या याच टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना होती म्हणूनच तुम्ही 10 वर्ष तुम्ही पंतप्रधान होऊ शकलात असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सोलापूर येथे महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.29) सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप, मोदी-शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवरही सडकून टीका केली.

ते म्हणाले, आम्हाला नकली शिवसेना म्हटल्यावर मी थोडाच सोडणार आहे. पण उद्या नरेंद्र मोदींची सभा धाराशिवमध्ये होत आहे.त्यांच्या जागी ते अजूनही उस्मानाबादच आहेत. पण तिथे सभा घेण्याआधी तुम्ही तुळजापूरच्या मंदिरात जाऊन भवानीमातेचे दर्शन घ्या. तसेच तुमच्या भाषणाची सुरुवात जय भवानीने करा. आम्ही त्याची वाट पाहतो. असं तुम्ही नाही केलं तर तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे असं इथला प्रत्येकजण समजेल असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं.

Uddhav Thackeray News
Praniti Shinde News : "दोन-दोन खासदार निवडले, आता उपरा आणून ठेवलाय", प्रणिती शिंदेंची सातपुतेंवर टीका

यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) खोचक टीका केली आहे.ते म्हणाले, फडणवीस आले तेव्हा ते टरबूज होते.पण आता ते पाव मुख्यमंत्री झाले आहेत.तसेच ते आता चिराट झाले असल्याचे म्हणत फडणवीसांवर ठाकरेंनी सडकून टीका केली. देशाला हुकूमशाहा सरकारची गरज नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारावेळी बोलताना त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.

मोदीजी तुम्हाला आमची देशाभिमानी कडवट शिवसेना नकोय, तुम्ही कुणाचा प्रचार करताय, तुम्हाला माहितीय? 2014 साली आणि 2019 साली मोदींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, असं होतं. पण आता एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं वातावरण असल्याचेही ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, जो या देशाला आपलं मानतो, तो आमचा आहे, अशी शिवसेना यांना नकोय, यांना ही नकली शिवसेना वाटतेय. रविश कुमार यांनी आज टाकलेला व्हिडीओ टाकलाय, भारतातील सर्वात मोठं सेक्स सँकडल, प्रज्वल रेवण्णा, देवेगौडा यांचा नातू त्यांचे हजारो सेक्स स्कँडल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि मोदीजी सांगत आहेत, या प्रज्ज्वलला मत दिलं, तर माझे हात बळकट होतील. असे तुमचे हात अशा कळकट हातांनी बळकट करणार आहात का असं म्हणत ठाकरेंनी बोचरी टीका केली. 

ठाकरे म्हणाले, घटना बदलण्यासाठीच भाजपला चारशे पार करायचे आहेत.पण घटना बदलण्याचा विचार जरी केला तर अख्खा देश पेटून उठेल. सर्वसामान्य लोकांच्या मनात हाच प्रश्न आहेत की, आमच्या आरक्षणाचं काय होणार आहे. हिंमत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात लावून दाखवाच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचवेळी त्यांनी कुणाच्या हातात आजची भाजपा आहेत हे पाहून अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.ते म्हणाले, ज्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणालात, पण आता शिवसेनेचा दणका काय असतो, ते येत्या 4 जूनला निकालातून कळेल असेही ठाकरेंनी दिला. तसेच शिवसेना होती म्हणून मोदी तुम्ही पंतप्रधान होऊ शकलात.पण आता हातात मशाल घेऊन आम्ही काँग्रेसच्या विजयाची तुतारी फुंकणार आहोत, तुम्हांला काय अडचण असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनावरची लस दिली तर ते काय शास्त्रज्ञ आहेत का? त्यांनी जर कोरोनावरची लस दिली तर आमचे संशोधक काय गवत उपटत होते का? अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. पण मला अभिमान आहे की, कोरोनावरची लस ही महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यातल्या पुनावाला यांनी बनवली असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray News
Shirur Lok Sabha Constituency : आधी कोल्हेंचा प्रचार केला आता आढळराव पाटलांसाठी गुडविल; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com