Kasba By-Election : अखेर रवींद्र धंगेकरांचे उपोषण मागे; भाजपवर केला होता 'हा' आरोप

Pune News : पोलिसांनी संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन धंगेकरांना दिले
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Kasba By-Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारतोफा शुक्रवारी (दि.24 फेब्रुवारी) थंडावल्या. गेल्या काही दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज (दि.25फेब्रुवारी) सकाळी कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसले होते. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी धंगेकर यांना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण पाच तासानंतर मागे घेतले.

Ravindra Dhangekar
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांनी दिलेले संकेत धूसर..; मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त...

कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. पण याआधीच धंगेकर हे कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. पोलिसांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे राजकारण तापले होते.

Ravindra Dhangekar
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ; 40 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

दरम्यान, भाजप पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकरांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, अखेर धंगेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक ही केंद्रबिंदू ठरत आहे. याच पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com