Ajit Pawar News : राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा? अजितदादांचं 'हे' उत्तर अन् कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

Loksabha Election 2024 : बारामतीत तुमच्या मनात ज्यांचं नाव आहे, त्यांचं नाव जाहीर होणार आहे, असेदेखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.
NCP Ajit Pawar Group
NCP Ajit Pawar GroupSarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. भाजप काँग्रेसकडून एकीकडे उमेदवारांची घोषणा केली जात असतानाच राज्यातील महाविकास आघाडीसह महायुतीचंही जागावाटप चर्चेतच अडकलं असून, 'फायनल' झालेलं नाही, पण याचवेळी जागावाटपावरून दावे-प्रतिदावे,आरोप- प्रत्यारोप, नाराजीनाट्य सुरू असताना महायुतीत अजित पवार गटाला चार जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण अजित पवारांनी लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर करतानाच मोठं विधान केल्यामुळे महायुतीत चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पुण्यात 'बोट क्लब' येथे मंगळवारी (ता. २६) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती. कारण या बैठकीला राज्यातून आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली.

NCP Ajit Pawar Group
Gadchroli Lok Sabha Election : सकाळी गडचिरोलीत दिला काँग्रेसचा राजीनामा, सायंकाळी नागपुरात घेणार भाजपचा ‘शेला’ ?

यानंतरच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी रायगडमधून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पण याचवेळी उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर भाष्य केले, पण याचवेळी त्यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार याबाबतही सूचक विधान केले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, महायुतीत आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भरपूर मागितल्या आहेत. 23 तर आधीच भाजपचे खासदार असून, 18 शिवसेनेचे आहेत. त्यातील काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. हे चित्र तिथं मांडलं गेलं. आता या सर्व मिळून जवळपास 41 जागा होतात. तरीदेखील आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल, अशा पद्धतीने आम्ही जागा मागितल्या आहेत, असे सूचक वक्तव्य करून अजित पवारांनी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पारड्यात 4 पेक्षा अधिक जागा मिळणार का, अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. याचवेळी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करू. बारामतीत तुमच्या मनात ज्यांचं नाव आहे, त्यांचं नाव जाहीर होणार आहे, असेदेखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्यासाठी आमची तयारी झाल्याचे अजित पवारांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडणुका या जिंकण्यासाठी लढायच्या असतात. त्यादृष्टीने आम्ही प्रत्येक मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे, तर आमदारावर 1 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. निवडणूक प्रमुख धनंजय मुंडे असणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

NCP Ajit Pawar Group
Gadchroli Lok Sabha Election : सकाळी गडचिरोलीत दिला काँग्रेसचा राजीनामा, सायंकाळी नागपुरात घेणार भाजपचा ‘शेला’ ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com