PMP News : बस नीट चालवता येत नाही का? कारचालकाची पीएमपीच्या ड्रायव्हरला मारहाण; गुन्हा दाखल

Pune Latest News : अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण; तब्बल आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Latest News :
Pune Latest News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बस नीट चालविता येत नाही का? असं म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना पुण्यातील मुंढवा चौकाजवळ घडली.

तर भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार वारजे एनडीए रस्त्यावर घडला. आज पुण्यात या दोन मारहाणीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पीएमपी बसचालकाला मारहाण

बस नीट चालविता येत नाही का, असं म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मुंढवा चौकाजवळ घडली. याप्रकरणी पीएमपी बसचालकाने फिर्याद दिली असून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune Latest News :
Threaten to Nitin Gadkari : मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन? १० कोटी रुपये खंडणीची मागणी

माहितीनुसार, पीएमपी बसचालक इबितदार हे मगरपट्टा-मुंढवा रस्त्याने सकाळी दहाच्या सुमारास वाघोलीच्या दिशेने जात होते. यावेळी मुंढवा चौकात एका कारचालकाने बसला पाठीमागून धडक दिली. यानंतर कारचालकाने बसचालकाला शिवीगाळ करत बसमधून खाली ओढून मारहाण केली. मात्र, या घटनेनंतर कारचालक पसार झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune Latest News :
Pimpri-Chinchwad : पिंपरी पालिकेत लिपिक एसीबीच्या जाळ्यात; भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये जुंपली

महापालिका अधिकाऱ्यास मारहाण :

भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना वारजे एनडीए रस्त्यावर घडला. याप्रकरणी संबधित अधिकाऱ्यानी फिर्याद दिली असून वारजे पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com