पुणे : भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सत्कार समारंभावरून पुण्यात पुन्हा वाद पेटला आहे. माजी खासदार सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या आवारात सत्कार करण्यास भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असलेल्या पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यावर पुणे शहर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून ते सत्कार करण्यावर ठाम आहेत, त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. (Pune Municipal Corporation denied permission to welcome Kirit Somaiya felicitation)
किरीट सोमय्या हे जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) पुण्यात आले होते. तक्रार दिल्यानंतर सोमय्या हे उपायुक्तांची भेट घेण्यासाठी पुणे महापालिका कार्यालयात गेले हेाते, त्यावेळी शिवसैनिक आणि सोमय्या हे आमने सामने आले होते, त्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या हे पायऱ्यांवर पडले होते. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर भाजपने त्याच ठिकाणी सोमय्यांचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले होते.
महापालिका आवारात सोमय्या यांचा सत्कार करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. परवानगी नसली तरी सोमय्या यांचा सत्कार करणारच, अशी भूमिका पुणे भाजपने घेतली आहे.
याबाबत शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, सोमय्या हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी जात असताना शिवसेनेच्या लोकांनी हल्ला केला. शिवसेनेच्या लोकांना एकत्र जमण्यासाठी सरकारने परवानगी दिली. आता भाजपतर्फे भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या नेत्याचा सत्कार होत असेल तर त्याला परवानगी नाकारण्याचा या सरकारला कोणताही अधिकार नाही. किरीट सोमय्या यांचा भाजप सत्कार करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करणे, हे योग्य आहे, अशी लोकांची भावना आहे. भ्रष्टाचाराविरेाधात लढणाऱ्या सोमय्या यांना शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून चुकीची वागणूक दिली. काँग्रेस पक्षाने गुरुवारी, तर राष्ट्रवादीच्या वतीने आठ दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले. मग आमच्याच कार्यक्रमांना परवानगी का नाकारता, असे प्रश्न मुळीक यांनी उपस्थित करत आम्ही सोमय्या यांचा सत्कार करणार म्हणजे करणार, असे आव्हानच सरकारला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.