सोमय्यांचा सत्कार केलेली पायरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्राने धुतली

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आज पुणे महापालिकेच्या पायऱ्यावर भाजपच्या (BJP) वतीने सत्कार करण्यात आला आहे.
Sachin Adekar
Sachin AdekarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिकेच्या (PMC) ज्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती त्याच पायरीवर भाजपने (BJP) आज (ता.11 फेब्रुवारी) सत्कार केला आहे. मात्र, भाजप-सेनेच्या या वादात अनपेक्षितपणे काँग्रेस (Congress) आज उडी घेत सोमय्यांचा सत्कार करण्यात आलेल्या त्या पायरीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून धुतले आहे. यामुळे आता भाजप-काँग्रेस अशा नवीन संघर्षाला सुरूवात झाली आहे.

Sachin Adekar
ऑर्थर रोड जेलमधील देशमुखांच्या शेजारची कोठडी परब-राऊत यांच्यासाठी तयार ठेवा

सोमय्यांचा सत्कार झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या त्या पायरीवर गोमुत्र शिंपडून पायरीला धुतले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोमय्यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला होता. पुणे शहरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपने स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याचा सत्कार करत असल्यामुळे पायरी धुतल्याचे सांगितले. पुणे काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन आडेकर यांनी ही पायरी गुलाबपाणी आणि गोमुत्र शिंपडून धुतली आहे.

भाजप नेते सोमय्या यांचा आज (ता.11 फेब्रुवारी) पुणे महापालिकेच्या सत्कार करण्यात आला आहे. सोमय्यांच्या सत्कारासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर, काँग्रेसने या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. या कार्यक्रमास पालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यानुसार काँग्रेसने आपला विरोध दर्शवत पायऱ्या धुतल्या आणि आपला विरोध केला आहे. सुरूवातीला भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू होता. मात्र, यामध्ये चक्क काँग्रेसने उडी घेतल्याने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

Sachin Adekar
वाईन विक्रीवरून ठाकरे सरकार अडचणीत? वाद पोचला उच्च न्यायालयात

दरम्यान, आज पुण्यात पोलिसांनी परवानगी नाकारली असतांनाही पुणे भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार केला गेला. यामुळे सोमय्यांनी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे आभार मानले. सोमय्यांना महापालिकेत येण्यासाठी हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा दिल होते. यामुळे अधिकच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सत्कार केल्यानंतर सोमय्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका करत शिवसेनेला पुन्हा आव्हान केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com