Maruti Navale: 'सिंहगड'चे संस्थापक नवलेंच्या विरोधात गुन्हा दाखल ; पीएफ निधीत अपहार...

Sinhagad Institute News: पुण्यातील सिंहगड सिटी स्कूलबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.
Maruti Navale
Maruti NavaleSarkarnama
Published on
Updated on

Pune : सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा न करता अपहार केल्याचे आरोप त्यांच्यावर आहे.

याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकाटे यांनी नवले यांच्याविरुद्ध न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने नवले यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड सिटी स्कूलबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्य निधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maruti Navale
Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाच्या नेत्याला अटक; मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं

काय आहे प्रकार...

कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात सिंहगड सिटी स्कूल आहे. या शाळेतील ११५ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एकूण मिळून ७४ लाख ६८ हजार ६२६ रुपये कपात करण्यात आले. त्यापैकी तीन लाख ७५ हजार ७७४ रुपये भविष्य निर्वाह कार्यालयात जमा करण्यात आले. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा अपहार करण्यात आला.

Maruti Navale
Maratha Reservation : शिंदे समिती रद्द होणार ? मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com