Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाच्या नेत्याला अटक; मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं

Shiv Sena News : विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं ठाकरे गटाच्या नेत्याला भोवलं. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत, आमदार सुनील राऊत, कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी भांडूप पोलिस ठाण्यासमोर जमले आहेत.

संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक विधान केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार दळवींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maratha Reservation : शिंदे समिती रद्द होणार ? मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरणार...

भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय झाले होते..

रविवारी (२७ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा गटातर्फे भांडूपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुहृदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी टीका केली होती. भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
MP Election 2023 : कोण जिंकणार भाजप की काँग्रेस; चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, पाच साक्षीदार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com