Maratha Reservation : 50 टक्क्यांवरती आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं 50 टक्क्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. यास महाराष्ट्रातील घटक म्हणून कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता आमचा पाठिंबा राहिल. सरकारला आमची समन्वयाची आणि सहकार्याची भूमिका राहिल, असं मत मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी मराठा आरक्षण मिळण्याबाबत मार्ग सांगितला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या समन्वयकांनी पुण्यातील 'मोदी बाग' येथे शरद पवारसाहेबांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर पवारसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्याचा सल्ला दिला. त्यासह केंद्र सरकार मराठा आरक्षणाचा विषय सोडवू शकते, असंही पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) सांगितलं आहे. ते मोदी बाग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवारसाहेब म्हणाले, "महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीनं पावले टाकली पाहिजेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्याबैठकीत मनोज जरांगे-पाटील, छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांना बोलावावं. विरोधी पक्षाच्यावतीनं आम्ही हजर राहू. आमची सहकार्याची भूमिका राहील."
"50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही, असा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. तामिळनाडूत 73 टक्क्यांच्या आसपास आरक्षण वाढलं आहे. तो निर्णय न्यायालयात टिकला आहे. परंतु, त्यानंतर 50 टक्क्यांवर आरक्षण देण्याबाबतीतील एकही निकाल न्यायालयात टिकला नाही," असं पवारसाहेबांनी सांगितलं.
"याचा अर्थ 50 टक्क्यांवरती आरक्षण देण्याबाबत धोरण बदललं पाहिजे. 50 टक्क्यांवर आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारनं 50 टक्क्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील घटक म्हणून कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता आमचं पूर्ण सहकार्य केंद्र सरकारला राहिल. सरकारला आमची समन्वयाची आणि सहकार्याची भूमिका राहिल. असा प्रयत्न करू मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढू," असं शरद पवारसाहेबांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.