Sharad Pawar Meet Dilip Sopal : साथ सोडलेल्या दिलीप सोपलांनाही शरद पवार विसरले नाहीत; बार्शीत घरी जाऊन घेतली भेट

Sharad Pawar Barshi Tour : मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांचीही पवार यांनी भेट घेतली. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले सोपल यांच्या घरी पवारांनी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Dilip Sopal- Sharad Pawar
Dilip Sopal- Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 August : बार्शीच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. 11 ऑगस्ट) आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांचीही पवार यांनी भेट घेतली.

सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले सोपल यांच्या घरी पवारांनी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) हे आज बार्शीच्या दौऱ्यावर आले होते. मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर पवार यांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची घरी जाऊन विचारपूस केली. झाडबुके यांनी पवारांना राखी बांधत घरी आलेल्या भाऊरायाचे औक्षण केले. प्रभाताई यांच्या तब्यतेची विचारपूस केल्यानंतर पवारांनी आपला मोर्चा माजी सहकारी दिलीप सोपल यांच्या घराकडे वळविला.

दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सत्कार केला. त्यानंतर पवारांसोबत त्यांचीही काही काळ चर्चाही झाली. दिलीप सोपल हे 1985 ते 1999 आणि 2009 ते 2019 पर्यंत बार्शीचे आमदार होते. त्यात त्यांनी दोन वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. इतर वेळी सोपल यांनी पवारांसोबत राहून राजकारण केले आहे.

Dilip Sopal- Sharad Pawar
Sharad Pawar : तब्यतेची विचारपूस करायला आलेल्या शरद पवारांना प्रभाताई झाडबुकेंनी बांधली राखी!

दिलीप सोपल हे 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पवारांच्या सूचनेनुसार ते युती सरकारमध्ये मंत्री झाल्याची सांगण्यात येते. सोपल यांनीही पवारांवरील आपली निष्ठा कधीही लपवून ठेवली नाही. ते अनेकदा भाषणातून आपला ‘शप’ (शरद पवार) पक्ष आहे, असे बिनधास्तपणे सांगायचे. त्यामुळे बार्शीचे दिलीप सोपल आणि शरद पवार हे समीकरण तयार झाले होते.

अत्यंत विश्वासू सहकारी असलेले दिलीप सोपल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेची 209 ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत सोपलांचा पराभव झाला होता. तेव्हापासून सोपल हे राजकीय घडामोडीपासून लांब होते.

Dilip Sopal- Sharad Pawar
Video-Sharad Pawar Sabha : पवारांच्या बार्शीच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे फडकावले, एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले

शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला सोपल उपस्थित राहत नव्हते. मध्यंतरी कोरोनाच्या काळात आमदार रोहित पवार यांनी सोपल यांची घरी जाऊन भेट घेतली होती. पण पवारांशी कुठलाही राजकीय संवाद नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पाच वर्षांनी पवार आणि सोपल यांची भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय क्षेत्रात विशेष चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com