Pune Assembly Election : मुरलीधर मोहोळांनी तातडीने गाठले ‘शिवतीर्थ’; राज ठाकरेंशी गुफ्तगू, पुण्यासाठी काय असेल प्लॅन?

Raj Thackeray Murlidhar Mohol BJP MNS : पुण्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे आपले उमेदवार उतरवणार आहेत.
Raj Thackeray, Murlidhar Mohol
Raj Thackeray, Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून पूर्ण झाली आहे. तरी देखील काही मतदारसंघांसाठी शेवटच्या टप्प्यात काही फासे टिकण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येतात. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या मदतीने पुण्यातील राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न मुरलीधर मोहोळ करत आहेत का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील विधानसभा मतदारसंघांसह मराठवाड्यातील काही महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचा विजय कसा सुकर करता येईल, यासाठी मोहोळ यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Raj Thackeray, Murlidhar Mohol
Ajit Pawar: राष्ट्रवादीत बंडांचे निशाण? अजितदादांची साथ सोडणार, हडपसरमधून 'हा' नेता अपक्ष लढणार; VIDEO पाहा

दुसरीकडे मनसेने एकला चलो ची भूमिका घेत राज्यातील तब्बल अडीचशे जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मराठवाड्यातील जागांसह पुण्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे आपले उमेदवार उतरवणार आहेत. पुणे शहराचा विचार केल्यास, मनसेकडून हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे.

आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होणार आहे. या बैठकीसाठी मनसेचे जिल्ह्यातील 10 नेतेही शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यात मनसेच्या एक जिल्हाप्रमुख एक शहरप्रमुख, 6 राज्य सरचिटणीस, 2 प्रवक्ते यांचा समावेश आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह जिल्ह्यातील 13 मतदारसंघाचा राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहे. या बैठकीमध्ये उमेदवार देखील फायनल होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray, Murlidhar Mohol
Dilip Valse Patil: शरद पवारांना का सोडलं? वळसे पाटलांनी सांगितलं कारण; पुलोद सरकारची आठवण

बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे यांनी उमेदवार दिल्यास त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे याबाबत चर्चा करून मनसेने काही ठिकाणी उमेदवार देऊ नये, अशी विनंती तर करण्यासाठी मुरलीधर मोहोळ गेले नव्हते ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. असे असले तरी मोहोळ यांच्याकडून ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com