Pune Lok Sabha Constituency 2024: चंद्रकांतदादांनी जाहीर केला काँग्रेसचा पुणे लोकसभेचा उमेदवार ?

Maharastra Lok Sabha 2024: वसंत मोरे अपक्ष उभे राहिल्यास फटका मोहन जोशींना बसेल? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Pune Lok Sabha Constituency 2024
Pune Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे लोकसभेच्या निवडणुकीबाबतची रणनीती ठरवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. एकीकडे भाजपकडून उमेदवारी निश्चिती करून प्रचाराची रणनीत आखण्यात येत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या गोटामध्ये अद्यापही उमेदवारीबाबतची खलबतं सुरू असून, अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच आज झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन जोशी यांचा उल्लेख केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यादृष्टीने काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वीस जणांनी इच्छा प्रदर्शित केली असली तरी प्रामुख्याने चार नावं सर्वाधिक चर्चेत आहेत.

Pune Lok Sabha Constituency 2024
Chhatrapati Sambhajinagar: शिवसेनेच्या यादीत संभाजीनगरचा उमेदवार असेल का?

यामध्ये कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल. इच्छुकांकडून आपापल्या परीने वरिष्ठांकडे मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. मात्र, अद्याप तरी कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी वसंत मोरे हेदेखील फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, अंतर्गत विरोधामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा दिल्याचे समोर आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोरे ही निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय. वेळप्रसंगी ते अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. मोरे हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास त्याचा फटका कोणाला बसू शकतो

याबाबत चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता पाटील म्हणाले, वसंत मोरे हे अपक्ष लढले तरी भाजपला त्याचा फटका बसणार नाही. कारण भाजपची मूळची मतं आहे ती भाजपकडेच राहणार आहेत. मागील वेळी मिळालेल्या सहा लाख 31000 मताधिक्य भाजपचं कायम राहणार आहे. त्यामुळे मोरे जर अपक्ष उभे राहिले तर भाजपची मते खाणार नाही, तर समोरच्यांची म्हणजेच मोहन जोशींची मते खातील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून मोहन जोशी हे उमेदवार असतील, असं भाजपने गृहीत धरलंय का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com