Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केला आहे. तसेच ज्या ठिकाणी उमेदवार उतरवणे शक्य नाही. त्या ठिकाणी जो उमेदवार 500 च्या स्टॅम्प पेपरवर आरक्षणाला पाठिंबा असल्याचं लिहून देईल त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हीे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर हजारच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
भाजपाकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातील इतर सहा उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहे.
दोन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील संपूर्ण 21 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमी वर आज महायुतीची समन्वय बैठक पुण्यात संपन्न झाली.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांना आमच आवाहन आहे की, त्यांनी नेमका आमचं काय चुकलं हे सांगाव. आजपर्यंत मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आले नाही ते आम्ही दिलं हे आमचं चुकलं का?, उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवलं ते योग्य होतं का? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आरक्षण देण्यात आलं ते चुकलं का? असा सवालही जरांगे पाटील यांंनी उपस्थित केला.
पूर्वी आरक्षण आणि सुविधा या एकत्र होत्या त्या देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा केल्या आरक्षण नसलं तरी त्या सुविधा लागू करण्यात आल्या. ई डब्ल्यू एस च्या माध्यमातून देण्यात आलेलं आरक्षण हे योग्य होतं असं आता समाजातली लोक म्हणत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव आहे असल्याचा खळबळजनक दावाही कोथरुडचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आता आग्रह धरला आहे की, जे जे उमेदवार पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतील की, मराठा आरक्षणासाठी आम्ही मदत करू त्यांना पाठिंबा द्यायचा, तर आम्ही एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की एस. सी. बी. सी. चं आरक्षण आम्ही टिकवून ठेवू, कारण आम्ही दिलेला आरक्षण उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही, सुप्रीम कोर्टात केस नीट चालवली नाही, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
आम्ही आता आरक्षण दिलं आहे. त्याला अद्याप सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जरांगे पाटील यांनी सकारात्मक विचार करावा आणि मराठा समाजाबाबत आम्ही देखील याबाबत सकारात्मक विचार करू, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.