Mumbai News: पुढील काही महिन्यांमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी महायुती म्हणूनच आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी आता महायुतीचं टेन्शन वाढवणारं खळबळजनक विधान केलं आहे.
एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर घेतलेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी तसे संकेतही दिले होते. पण एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेशाशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य न करण्याचे आदेश दिले असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची आधीची भाषा बदलली.पण आम्ही आमची भाषा आणि लाईन कधीच बदलली नसल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.
तसेच कुठेतरी इगो बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे यांनी जायला हवं. दोन ठाकरे एकत्र येतील की नाही हे तेच ठरवतील. आम्ही आमचं संघटन वाढवू,ताकद वाढवणार असल्याची भूमिकाही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मांडली.
याचदरम्यान,त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विचार सोडले.ते आता जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत वेगळी भूमिका घेत आहेत. जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हंटलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे हे विरोधासाठी विरोध करत असल्याचा हल्लाबोलही चव्हाण यांनी ठाकरेंवर केला होता.
रवींद्र चव्हाणांनी यावेळी एक मोठा बॉम्ब टाकला. ते म्हणाले,अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहिताचा विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं त्यांनी सांगत खळबळ उडवून दिली आहे.
चव्हाण म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे मला देखील तेच वाटले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मी गोव्यावरून इकडे आलो होतो. त्यामुळे माझ्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे ज्या गाडीतून आम्ही एअरपोर्टवरून त्या ठिकाणी गेलो होतो, राज्यपालांच्या येथे गेल्यावर मला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नसल्याचं कळलं.
पण हे कोणालाही माहिती नव्हतं,कदाचित फडणवीसांना माहीत असेल.मला हे माहिती झालं, तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दु:ख वाटलं.त्यावेळी मी तिथून बाहेर पडलो,अतिशय मोठा पाऊस पडत होता.मी अस्वस्थ झालो,डोळ्यात पाणी होतं.त्यानंतर चालत चालत नाक्यापर्यंत गेलो.तिथे टॅक्सी पकडली,ट्रेनमध्ये बसलो आणि घरी गेलो,असा किस्सा रवींद्र चव्हाण यांनी सांगितला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.