चंद्रकांत पाटील म्हणतात;एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे अतिशय अमानवीय आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.

सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या सवलती मिळतात, त्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, ‘‘ एसटी कर्मचारी न्याय्य हक्कासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपाची भूमिका आहे. आम्ही कोणत्याही श्रेयासाठी या आंदोलनाला साथ देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. कारण त्यांना जनतेच्या मनातलं कळायचं. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला. आपल्या हक्कासाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय आहे.

चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी-शिवसेनेचा एकोपा ही तर आगामी विजयाची नांदी

भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी आम्ही आदिवासींना जे लाभ मिळतात, ते धनगर समाज बांधवांना लागू केले. त्यानुसार राज्य सरकारने ज्या सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. त्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचे जाहीर करुन, हा प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावी.

चंद्रकांत पाटील
PMRDA निवडणूक : कॉंग्रेसची दोन मते कशी फुटली; बागूल-धंगेकरांना पक्ष विचारणार जाब

मालेगावमध्ये सुरू असलेल्या प्रकारावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ जगभरात कुठेही काही घडलं, तर त्यावर देशात मूठभर लोकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे न कळणारे आहे. त्रिपुरातील घटनेवरुन काही मुठभर लोक मालेगावमधील देशभक्त मुस्लिम समाजबांधवांना बदनाम करण्याचं काम करत आहेत.’’‌

हडपसर जमीन प्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे स्वागत करताना पाटील म्हणाले, "माझ्या खोट्या सही, शिक्का आणि महसूल नंबरचे आदेश काढून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मी स्वतः या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, हे प्रकरण अतिशय गंभीर असून, याची सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच अशाप्रकारे खोट्या आदेशाद्वारे असे प्रकार झाल्या का? याचा शोध घेण्याची विनंती केली होती. कारण उद्या विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावे असे बनावट आदेश काढून जमीन बळकावण्याचा प्रकार होऊ शकतो."

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com