पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकारणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दहा नगरसेवक असताना पक्षाचे उमेदवार नगरसेवक चंदूशेठ कदम यांना आठच मते कशी मिळाली. दोन मते कुठे कशी फुटली याचा शोध घेण्यासाठी पक्षाच्यावतीने पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागूल व पक्षाच्यावतीने या निवडणुकीची जबाबदारी पाहाणारे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितली.
या निवडणुकीची मतमोजणी आज दुपारी संपली. निवडणुकीच्या निकालालने कॉंग्रेसची पुरती नाच्चकी झाली. शिवाय कॉंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीत एकवाक्यता नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. नियोजन समितीवर निवडून जाण्यासाठी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक चंदूशेठ कदम यांना केवळ आठ मते मिळाल्याने कॉंग्रेसची हक्काची मते कशी फुटली याची चर्चा पक्ष पातळीवर सुरू झाली आहे.
या संदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘आमच्या पक्षाच्या उमेदवाराला किमान दहा मते मिळणे अपेक्षित होती. मात्र, दोन मते कमी मिळाल्याने ही मते कुठे गेली याचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात पक्षाचे गटनेते आबा बागूल व या निवडणुकीची जबाबदारी असलेले नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्याकडून अहवाल घेण्यात येईल. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन मते नेमकी कुठे गेली हे स्पष्ट होईल.’’
दरम्यान, नगरसेवक चंदूशेठ कदम यांना मिळालेली मिळणारी दोन मते फुटली असून ती राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाल्याचे निकालातील मतांवरून दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुळात या निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवार उभा करण्याची गरज नव्हती. कॉंग्रेसच्या अट्टाहस केल्याने निवडणूक घ्यावी, लागली अन्यथा ही निवडणूक बिनविरोध घ्यावी लागली.मात्र, निकालातून कॉंग्रेसमधील मतांची फाटाफूट आणि गटतट पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहेत.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.