Ajit Pawar Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे अजितदादांच्या कार्यक्रमाला का नाही गेले? भाजप मंत्र्याने सांगितले कारण

Chandrashekhar Bawankule Mayuti Shinde Vs Pawar : आमची महायुती प्रचंड मजबूत आहे. कुठेही बेबनाव नाही. शिंदे, फडणवीस आणि पवार हे एकत्र भावासारखे काम करत आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Ajit Pawar| Eknath Shinde
Ajit Pawar| Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचा घटक असलेल्या एकनाथ शिंदेंनी दांडी मारल्याचा पाहायला मिळाले. तसेच त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक यांना पाठवले होते. यावर अजित पवारने देखील नाराज व्यक्त केली. यानंतर महायुतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बेबनाव आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना भाजप प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.

माध्यमांशी बोलताना बावनुकळे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्ष म्हणून एक मोठी संघटना आहे. महाराष्ट्रभरात संघटना चालवत असताना आधीच 15 दिवस, महिनाभर कार्यक्रमांना तारखा दिलेल्या असतात त्यामुळे पक्षाच्या महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यक्रमात शिंदे अडकलेले असू शकतात. सोबतच त्यांच्याकडे चार-पाच खात्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या महत्त्वाचं काम आल्याने जर ते एखाद्या कार्यक्रमाला गेले नाहीत म्हणजे नाराजी आहे असं होत नाही.'

Ajit Pawar| Eknath Shinde
Shivsena Conflict : मोठी बातमी! धनुष्यबाण, शिवसेना पक्ष ठाकरेंचा की शिंदेंचा? कोर्टाच्या निर्णयाची तारीख ठरली! तब्बल दीड वर्षानंतर सुनावणी

'संजय राऊत यांना टीका टिपणी करण्याशिवाय दुसरी भाषा येत नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीने टीका करत आहेत. त्यानुसार त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समजलेच नाहीत असं दिसत आहे. संजय राऊत हे छोटे आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळांना मोदी समजायला वेळ लागणार आहेत. पंतप्रधान हे देश हिताचा निर्णय घेऊन पाकिस्तानला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने रोज चिथावणी खोर वक्तव्य करत आहेत ते सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहे.', अशी टीका बावनकुळे यांनी केली.

संजय राऊत काँग्रेसमय

भाजपचे नेत्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इतिहास वाचावा असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, की सध्या संजय राऊत काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या संविधान स्वीकारला असून त्यामुळेच ते काँग्रेसची भाषा बोलत आहेत.

महायुती प्रचंड मजबूत...

आमची महायुती प्रचंड मजबूत आहे. कुठेही बेबनाव नाही. शिंदे, फडणवीस आणि पवार हे एकत्र भावासारखे काम करत आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे. विरोधक या तिघांमध्ये बेबनाव असल्याचे चित्र निर्माण करून राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याचे टीका बावनकुळे यांनी केली.

Ajit Pawar| Eknath Shinde
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ का म्हणाले, "शरद पवारांना कळते केव्हा पाठिंबा द्यायचा केव्हा राजीनामा मागायचा"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com