Pune Porsche Car Accident Case : 'पुणे पोर्श अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविणार' ; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही!

CM Shinde on Pune Porsche Car Accident Case : या अपघातातील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
CM Shinde
CM ShindeSarkarnama

Pune Porsche Accident case Upadate : पुणे पोर्श अपघात प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. या अपघात प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवून हा अपघात केला होता. गेल्या महिन्यात 19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.

CM Shinde
Pune Porsche Car Accident latest News : पुण्यातील पोर्श 'कार'नामा प्रकरणातील 'त्या' 15 जणांची पोलिसांनी घेतली परेड!

या अपघातामध्ये कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरून जाणाऱ्या या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अल्पवयीन बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्यासाठी पोलिसांकडून तसेच बाल हक्क न्याय मंडळ तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून विशेष प्रयत्न करण्यात. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हे सर्व उघड झाले.

ही घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल. तसेच या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबांना दिली.

CM Shinde
Porsche Car Accident Case : कल्याणीनगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विशाल अगरवालला जामीन मंजूर, पण...

आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना पुन्हा सावरता यावे यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही शिंदे यांनी घेतला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com