Porsche Car Accident Case : कल्याणीनगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विशाल अगरवालला जामीन मंजूर, पण...

Vishal Agarwal Bail Granted : पुण्यातील कल्याणी नगर चौकात 19 मे रोजी अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कारखाली दोन जणांना चिरडले होते.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने सरकारसह पोलिस प्रशासन आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते.

आता याच कल्याणीनगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्यांचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कल्याणी नगर चौकात 19 मे रोजी अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कारखाली (Porsche Car Accident Case) दोन जणांना चिरडले होते. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडील आणि आजोबांवरही पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे सध्या हे अगरवाल कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच या अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोर्शे कार अपघातप्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तीनपैकी एका गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे.त्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण इतर दोन गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांचा मुक्काम सध्यातरी येरवडा कारागृहातच राहणार आहे.

Pune Hit And Run Case
OBC Leaders Meeting Update : ओबीसी नेत्यांची सरकारसोबतची बैठक संपली; CM शिंदेंनी घेतले 'हे' दोन मोठे निर्णय

आरोपी विशाल अगरवालविरोधात मुलगा अल्पवयीन आणि दारूच्या नशेत असल्याची कल्पना असूनही चारचाकी वाहन दिल्याने येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अगरवालला जामीन (Bail) आला मंजूर करण्यात आला आहे.

मात्र,खंडणी,फसवणुकीसह पुरावा नष्ट केल्याच्या इतर गुन्ह्यांत विशाल अगरवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.विशाल अग्रवालच्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या बहीण पूजा जैन मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Pune Hit And Run Case
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले राजकीय कारकीर्द संपवणार; भुजबळांनी एका वाक्यातच विषय संपवला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com