Chinchwad By- Election : पंकजा मुंडेंनतर चिंचवडच्या पीचवर श्रीकांत भारतीयांची फिल्डींग

भाजपच्या बूथ नियोजनापासून ते मतदान प्रक्रियेच्या सूक्ष्म नियोजनापर्यंत श्रीकांत भारतीय स्वतः जातीने लक्ष घालताना दिसत आहेत.
Chinchwad By- Election
Chinchwad By- Election Sarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By- Election : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, भाजपने मात्र ती जागा कायम ठेवण्यासाठी पूर्णतः ताकद लावली आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा महाविजय 24 चे संयोजक आ. श्रीकांत भारतीय यांनी गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामच पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकला आहे.

भाजपच्या बूथ नियोजनापासून ते मतदान प्रक्रियेच्या सूक्ष्म नियोजनापर्यंत श्रीकांत भारतीय स्वतः जातीने लक्ष घालताना दिसत आहेत. प्रचाराचा आढावा आणि अनेक महत्त्वाचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत असल्याने विरोधकांना श्रीकांत भारतीय यांच्या मुक्कामाने चिंता लागली आहे. महाविजय 2024 ची जबाबदारी मिळताच येणाऱ्या काळात भाजपाचा महाविजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

Chinchwad By- Election
Supreme Court hearing : जुने सरकार किंवा जुने अध्यक्ष परत आणा, सिब्बलांच्या या युक्तीवादावर न्यायाधीश म्हणाले...

तसेच पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत प्रभारी म्हणून यशस्वीपणे श्रीकांत भारतीय यांनी जबाबदारी पार पाडली होती. राष्ट्रवादीच्या हक्काची जागा खेचून आणत विजय मिळवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास सहकारी आणि विश्वासू असलेले आमदार श्रीकांत भारतीय यंदा पिंपरी चिंचवडच्या मोहिमेसाठी पूर्ण ताकदीने मुक्कामी आल्याने ही जागा राखण्याची भाजपाची नीती यशस्वी होईल, अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

ही जागा जिंकणे हीच लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली असणार- श्रीकांत भारतीय

पिंपरी चिंचवडच्या विकासाचे स्वप्न लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पाहिले होते, सतत लोकांमध्ये राहणारा कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची प्रतिमा होती, त्यांच्या अकाली जाण्याने पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आणि भाजपचेही नुकसान झाले आहे. ही पोटनिवडणुक जिंकत राहिलेले लक्ष्मणभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगताप परिवार काम करेल असा विश्वास आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com