
Pune News, 25 Feb : दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमा दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या.
असा गौप्यस्फोट नीलम गोर्हे यांनी केला होता. यानंतर ठाकरेंची सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर नीलम गोर्हे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. आता या आंदोलनाला शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) आंदोलनांनी उत्तर दिलं जात आहे.
नीलम गोर्हे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आली तसेच ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून नीलम गोर्हेंवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील नीलम गोर्हे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी नीलम गोर्हे यांच्यावर टीका करताना नीलम गोर्हे ही निर्लज् आणि विश्वासघातकी बाई आहे. खरंतर महाराष्ट्राने त्या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. त्या विश्वासघातकी बाई आहेत, अशी जहरी टीका केली आहे. यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे.
आंदोलना दरम्यान बोलताना शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) म्हणाले, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शहराध्यक्ष, स्थायी समितीचे सदस्य पद तत्कालीन संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी 25 लाखांची मागणी केली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही संजय राऊतांच्याकडे होती.
यातील पाच लाखांची एन्ट्री सुद्धा झालेली आहे. असा गंभीर आरोप नाना भानगिरे यांनी संजय राऊत आणि बाळा कदम यांच्यावर केला आहे. तसेच मला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. ती काढायला लावू नका. तुमचे बेताल वक्तव्य अगोदर थांबवा, असा इशाराच नाना भानगिरे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.