
Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या चरित्र बाबत गंभीर दावे केल्यानंतर आता तिचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. हगवणे कुटुंब, त्यांच्या वकिलांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
वैष्णवीचे (Vaishnavi Hagawane) वडील अनिल कस्पटे यांनी पुण्यात गुरुवारी (ता.29) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “काल आरोपींचे वकील जे बोलले ते समाजाने ऐकले. ते अत्यंत चुकीचे आहे. एका मुलीच्या चारित्र्यावर अशाप्रकारे बोलणे अक्षम्य आहे. माझ्या मुलीचा बळी गेला असून, तिच्या मृत्यूला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
कस्पटे म्हणले , वैष्णवीच्या चॅटिंगबाबत आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतला जात आहे, हे अत्यंत दुःखद आहे. “माझ्या मुलीचा मोबाईल जबरदस्तीने काढून का घेतला गेला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच जावई शशांक हगवणे (Shashank Hagawane) याच्या मागणीनुसार आपण जावयाला 1 लाख 52 हजार रुपये किमतीचा मोबाईल दिला आहे. त्यांनी तो मागितला होता, म्हणून आम्ही दिला. आजही त्या मोबाईलचे हप्ते मी भरतोय, असं अनिल कस्पटे म्हणाले.
फॉर्च्यूनर गाडीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “मी आधी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती, पण वाद झाले. फॉर्च्यूनर न दिल्यास, हेक्टर पेटवून देईन, असं धमकावण्यात आलं. म्हणून आम्ही फॉर्च्यूनर दिली. आरोपीकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, हा दावा खोटा आहे. ज्या गाडीबाबत वकिलांनी कोर्टात सांगितलं ती गाडी दुसऱ्याच्या नावावरती असल्याचं देखील अनिल कस्पटे यांनी सांगितलं.
“वैष्णवीच्या मृत्यूनंतर जेव्हा आम्ही बाळ आणायला गेलो, तेव्हा आरोपी नव्हते. मग निलेश चव्हाण यांच्या घरी गेलो, तिथे पिस्तूल दाखवून भीती दाखवण्यात आली. निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ कसे गेले, हा मोठा प्रश्न आहे. असेही कस्पटे यांनी स्पष्ट केले.
“वैष्णवी आत्महत्या करण्याआधी सलग पाच-सहा दिवस तिला मारहाण झाली. हे हगवणे कुटुंबीय सातत्याने करत होते. आता तिच्यावर आरोप करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. हे थांबवले पाहिजे,” असे म्हणताना कस्पटे भावुक झाले आणि पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळले.
“आमचा सुपेकर यांच्याशी काही संबंध नाही. असा दावा हगवणे कुटुंबाकडून करण्यात येत असेल तर पत्रिकेत मामा म्हणून नाव कसं दिलं. तसंच लग्न ठरवताना देखील जालिंदर सुपेकर हे मामा असल्याचा आम्हाला सांगण्यात आला होतं, असंही कस्पटे कुटुंबीय म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.