Video Ajit Pawar : "दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना!" हातात फ्लेक्स धरत भरसभेत तरुणाची अजितदादांना साद

NCP Ajit Pawar Jansanman Yatra Maval : हातात 'अजितदादा परत आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', अशी साद घालणारा फ्लेक्स आणि थेट अजित पवारांसमोर मोठमोठ्याने "अजितदादा, अजितदादा" अशा घोषणा देणाऱ्या एका कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल.
NCP Ajit Pawar Jansanman Yatra Maval
NCP Ajit Pawar Jansanman Yatra MavalSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar Jansanman Yatra : हातात 'अजितदादा परत आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', अशी साद घालणारा फ्लेक्स आणि थेट अजित पवारांसमोर मोठमोठ्याने "अजितदादा, अजितदादा" अशा घोषणा देणाऱ्या एका कार्यकर्त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची (NCP) जनसन्मान यात्रा आज शुक्रवारी (ता.16) मावळमध्ये आहे. या यात्रेदरम्यान, भाषणासाठी उभे राहिलेल्या अजित पवारांसमोर या तरुणाने घोषणा देत फ्लेक्स झळकवल्याचा प्रकार घडला.

तर यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तरुणाकडे बोट दाखवत मी तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणत त्याला शांत केलं. तर तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांने तरुणाच्या हातातील फ्लेक्स घेत त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे सुरुवातीला तिथे उपस्थितांचा एकच गोंधळ उडाला.

NCP Ajit Pawar Jansanman Yatra Maval
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाची नोटीस; लोकसभा निवडणुकीतील विजयाचे काय होणार?

दरम्यान, तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांने तरुणाच्या हातातील फ्लेक्स घेत त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता या तरुणाने झळकलेल्या फ्लेक्सची चर्चा जोरदार सुरु आहे. तर आता या कार्यकर्त्याला अजितदादा भेटणार का? आणि भेटलेच तर त्याच्या मागणीवर काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com