विमानतळ पुन्हा खेडला गेले, तर त्याची जबाबदारी संजय जगतापांची असेल!

पुरंदर विमानतळावरून विजय शिवतारे यांची आमदार संजय जगताप यांच्यावर टीका
Sanjay Jagtap- Vijay Shivtare
Sanjay Jagtap- Vijay Shivtare Sarkarnama
Published on
Updated on

गराडे (जि. पुणे) : ‘‘मी आमदार असताना पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यावेळीसुद्धा संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी दांडी मारली होती. निदान आता ते लोकप्रतिनिधी असताना तरी त्यांनी एकमत घडवून आणले पाहिजे. त्यांच्या आडकाठीमुळे पुरंदर विमानतळाचा फुटबॉल झाला आहे. विमानतळ पुन्हा खेडला गेले, तर त्याची सर्व जबाबदारी आमदार संजय जगताप यांची असेल,’’ अशी टीका शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली. (Vijay Shivtare criticizes MLA Sanjay Jagtap from Purandar Airport)

वाघापूर (ता. पुरंदर) येथे पिसर्वे-माळशिरस जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुरंदर तालुका शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकारी व संचालकांचा सन्मान शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवतारे बोलत होते.

Sanjay Jagtap- Vijay Shivtare
सभापतिपदाची निवडणूक : शिवसेना-काँग्रेस उमेदवाराचा विजय भाजपच्या हाती!

शिवतारे म्हणाले की, अडीच वर्षांपासून विमानतळाच्या बाबतीत रोज नवीन वार्ता ऐकायला मिळत आहेत. विमानतळ हे फक्त पुरंदर-हवेली नव्हे; तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. खेड भागातील सर्व राजकीय लोक विमानतळासाठी एकत्र येऊ शकतात, तर पुरंदर-हवेलीच्या राजकारण्यांना हे का शक्य नाही? पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरमध्येच होणे गरजेचे आहे. विमानतळामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबर तालुक्यात औद्योगिक प्रगती वेग घेईल.

Sanjay Jagtap- Vijay Shivtare
शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे धडा शिकवणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, सभापती नलिनी लोळे, माजी सभापती अतुल म्हस्के, युवासेनेचे जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड, उद्योजक महादेव शिंगाडे, ॲड. नितीन कुंजीर, युवासेना तालुका प्रमुख मंदार गिरमे, बाळासाहेब कोलते, मनोज कुंजीर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com