पिंपरीच्या आयुक्तांची अवैध धंद्याविरोधात मोहिम; चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Pimpri Chinchwad News : कामाकडे कानाडोळा करणं पोलिसांना भोवलं...
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad News : पिंपरी पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील चार पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

निलंबीत करण्यात आलेल्या चार पोलीस शिपयांवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यावसायाला पाठीशी घातल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या कामाकडे कानाडोळा करणं या पोलिसांना चांगलंच भोवलं आहे.

या संदर्भात पोलीस आयुक्तांनी गेल्या सहा दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील अवैध व्यावसायाबाबत आढावा घेतला होता. मात्र त्यानंतर दोखील कारवाई न करता संबधित पोलिसांनी याकडे कानाडोळा केला. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर थेट तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबीत करण्यात आलेले हे चार पोलीस शिपाई निगडी पोलिस स्टेशनचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad
Jayant Patil : जयंत पाटलांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; म्हणाले...

दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी पदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाण्यांना ‘टॅब’ देण्यात आला आहे. या ‘टॅब’च्या माध्यमातून पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येकाची नोंद घेतली जाते. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्याच्या कामाचे स्वरुप आदी तपशील यामध्ये नोंदवला जातो. एवढंच नाही तर फीडबॅक देखील भरून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्या कामाची चांगलीच चर्चा आहे. तर आज केलेल्या कारवाईमुळे पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com