Lok Sabha Election 2024: अबब! पुण्यात आचारसंहिता भंगाच्या 'इतक्या' तक्रारी!

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाला दिलेले आहेत. या काळात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सी-व्हिजिल' हे ॲप सुरू केले आहे
Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha Election 2024Sarkarnama

Pune Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या (सोमवारी) 13 मे रोजी होणार आहे. या मतदानाचे आवश्यक ती तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान केंद्रे आणि मतदान अधिकारी कर्मचारी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पोहचले आहेत. मतदारांच्या मदतीसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात (Pune) समावेश असलेल्या पुणे शहर मावळ आणि शिरूर या लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. काल शनिवारी संध्याकाळी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आपला जाहीर प्रचार थांबविला आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरल्याने नागरिकांच्या गाठीभेटी घेत आणि अधिकाधिक नागरिकांनी मतदान बाहेर पडावे यासाठी काय उपाययोजना करावी याची रणनीती आखण्यामध्ये सध्या पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवार गुंतले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकी दरम्यान 15 मार्च ते आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात 'सी- व्हिजील' ॲपच्या (C-Vigil App) माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तब्बल 1 हजार 505 तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. या सर्व तक्रारींची शहानिशा करून यापैकी एक हजार 329 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. तर 176 तक्रारींमध्ये काहीही तथ्य न आढळल्याने त्या निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली.

लोकसभेच्या निवडणुका निर्विघ्न आणि शांततेच्या मार्गाने पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती काळजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) घेतली जात आहे. निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाला दिलेले आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सी-व्हिजिल' हे ॲप सुरू केले आहे. या आपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी यावर दाखल केल्या जात आहेत. यामध्ये तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव कोठेही प्रसिद्ध केले जात नाही.

'सी-व्हिजिल' ॲपच्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. या ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय आहे. या ॲपवर 15 मार्चपासून आत्तापर्यंत दीड हजाराहून अधिक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यापैकी 1 हजार 329 तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने त्याची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे.

Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकर गिरवणार 'कसब्याचा कित्ता; निवडणूक आयोगाकडे घेतली धाव!

आचारसंहितेचे (Code of Conduct) उल्लंघन करणाऱ्या चुकीच्या प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना करता येते. थेट ऑनलाईन ही तक्रार करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतदानाच्या दिवशीदेखील या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करता येणार आहेत. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तातडीने सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे, 18002330102 आणि 1950 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha: मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने घेतले 'हे' तीन महत्त्वपूर्ण निर्णय

आचारसंहिता भंगाच्या विधानसभा निहाय जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे आलेल्या तक्रारी पुढीलप्रमाणे

बारामती : 54

आंबेगाव : 23

दौंड : 28

भोसरी :04

चिंचवड : 33

हडपसर : 47

भोर : 03

इंदापूर : 47

कसबा पेठ : 247

जुन्नर : 37

खेड आळंदी :03

कोथरूड :43

मावळ : 45

पुणे कॅन्टोन्मेंट : 109

पर्वती : 258

पिंपरी : 11

शिरूर : 32

पुरंदर : 11

वडगाव शेरी : 321

शिवाजीनगर : 71

खडकवासला: 78

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com