Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकर गिरवणार 'कसब्याचा कित्ता; निवडणूक आयोगाकडे घेतली धाव!

Ravindra Dhangekar News : कसबा पोटनिवडणुकी दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत मतदाना दिवशीच सपत्नीक आंदोलन केलं होतं.
Ravindra Dhangekar News
Ravindra Dhangekar NewsSarkarnama

Pune News: पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर काढणार आणि त्याचा वापर पुण्याच्या निवडणुकीमध्ये करणार असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आता धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे.

कसबा पोटनिवडणुकी दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत मतदाना दिवशीच सपत्नीक आंदोलन केलं होतं. यामुळे मतदानादिवशी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा कुठेतरी रवींद्र धांगेकर यांना झाल्याचं पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील धंगेकरांकडून अशाच प्रकारचे आरोप केले असून आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar News
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सभेचा खर्च वादात, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षानं घेतली हरकत

पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. वरील चारही मतदारसंघात निवडणूक आचार संहिता ढाब्यावर बसवून झोपडपट्टी भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार सद्यस्थितीत नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत आहेत. असं निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात धंगेकरांनी म्हटलं आहे.

Ravindra Dhangekar News
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी सांगितला आंध्र प्रदेशमधील 'BJP'चा अर्थ, म्हणाले...

पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या मतदारसंघात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवून, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत. मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत होणारी बेकायदेशीर मतदार वाहतूक हा पुणे लोकसभा मतदारसंघाचा दुर्दैवी इतिहास आहे. या वेळीदेखील भारतीय जनता पक्षाने मतदार वाहतूक करण्यासाठी रिक्षा, उबेर, बस, खाजगी दुचाकी स्वार यांची नेमणूक केली असून या वेळी मतदार बेकायदेशीर वाहतूक घडल्यास काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देखील धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

Ravindra Dhangekar News
Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
Ravindra Dhangekar News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

काय आहेत धंगेकरांच्या मागण्या ?

१. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, शिवाजी नगर या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याने संवेदनशील घोषित करावेत.

२. पुरेसे पोलीस मनुष्यबळ पुरवण्यात यावे.

३. बेकायदेशीर मतदारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून गाडी मालकांवर गुन्हे दाखल करावेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com