Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा हात हातात घेऊन... ; शाहांसोबत झालेली चर्चा जशीच्या तशी ठाकरेंनी सांगितली...

Shivsena UBT Vs BJP : बाळासाहेबांची प्रकृती खालावत होती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यावेळी मी बाळासाहेबांचा हात हातात घेतला आणि त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवीन म्हणून वचन दिले
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : विधानसभा 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून बिनसले. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळ वाटून घेण्यावरून 25 वर्षांची युती तुटली. भाजपकडून दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्याशी चर्चा करून राज्यात युतीचा प्रयोग केला होता. ती तुटण्यास समोरील पक्ष कारणीभूत असल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे. त्यानंतरही युती तुटण्यास कारणीभूत ठरलेला मुख्यमंत्री पदाचा मुद्यावर नेमकी काय चर्चा झाली होती, याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray वारंवार सांगतात की 'मातोश्री'तील बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्रीपदाबाबात चर्चा झाली होती. त्यास त्यांनी मान्यताही दिली होती. भाजपकडून मात्र ती चर्चा नाकारण्यात येत आहे. त्यावरून उभय पक्षांत नेहमीच वाद होत आला आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांची प्रकृती खालावत होती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यावेळी मी बाळासाहेबांचा हात हातात घेतला आणि त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवीन म्हणून वचन दिले. त्यांनाही वाटत असेल की एवढा मोठा पक्ष वाढवला पण मुख्यमंत्री होत नाही म्हणून.

बाळासाहेबांना दिलेले वचन जसेच्या तसे मी अमित शाहांना Amit Shah सांगितले. त्यावर ते ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे म्हणाले. मी मात्र त्यांना तसे करू नका, अशी विनंती केली. असे झाले तर आपापसातच पाडापाडीचे राजकारण होईल. त्यामुळे आपण अडीच-अडीच वर्षांचा समझोता करू. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यावे. त्यानुसार पहिली संधी शिवसेनेला दिली तर आपण एक पत्र तयार करू. त्यावर पक्षप्रमुख म्हणून माझी आणि जो कोणी मुख्यमंत्री असेल त्यांची सही असेल. त्या पत्राच्या मसुद्यात जी काही तारीख असेल त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री पद सोडेल, असे नमूद करू. त्या पत्राचे बॅनर करून तु्म्ही होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारावर लावा. युती असल्याने आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, असे ठरल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Uddhav Thackeray
Thane Politics : शिंदेंच्या ठाण्यात नरेश म्हस्केंचा रातोरात 'गेम'; मोदींच्या रॅलीत श्रीकांत शिंदे, कपिल पाटलांना मानाचं पान

दरम्यान, या चर्चेनंतर लोकसभा निवडणुकीला दोन ते तीन तर विधानसभा निवडुकीला पाच-सहा महिन्यांचा कालवधी बाकी होता. त्यामुळे जे काही ठरले होते, ते त्याचवेळी जाहीर करण्याची गरज नव्हती. त्यातून त्यांनी पदे आणि जाबाबदाऱ्यांचे समसमान वाटप करू, असे सांगितले. आता समसमान वाटपात मुख्यमंत्री पदाचे काय करायचे, याचा अर्थ लावा, असेही आवाहन ठाकरेंनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता मात्र त्या निवडणुकीत झालेल्या सभांतून मुख्यमंत्री BJP भाजपचाच होईल, असे वारंवार म्हटले जात होते. त्यावेळी ठाकरेंनी आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर ठाकरे म्हणाले, आधी तुमचा किंवा माझा मुख्यमंत्री होईल, कुणाचाही होऊद्या, तसे आमचे ठरलेच होते. त्यामुळे सभांत ते भाजपचा मुख्यमंत्री होणार, असे सांगत असले तरी मी काही बोलत नव्हतो. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा आम्हाला दिलेला शब्द हा जुमलाच ठरला, असा खुलासा ठाकरेंनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Mumbai Politics : मुंबईत लढाई शिवसेनेची; पण मतदारांना आवाहन बिहारीबाबूचं..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com