

Congress-Vanchit Alliance: महापालिकेसाठी विविध प्रकारच्या आघाड्या राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाल्या. यामध्ये भाजप-शिवसेना, काँग्रेस-वंचित, ठाकरे सेना-मनसे-शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकटी अशा प्रकारे युत्या किंवा आघाड्या झाल्या होत्या. या युत्यांमध्ये भाजप-शिवसेनेनं मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. तसंच ठाकरे सेना-मनसे युतीमध्ये शिवसेनाला फायदा झाला पण मनसेला समाधानकारक फायदा मिळाल्याच दिसत नाही. तर दुसरीकडं काँग्रेक आणि वंचितची आघाडी होऊन, एकत्र सभाही झाल्या होत्या. पण तारीही मुंबईत शिवसेना-वंचित आंचे अपेक्षित नगरसेवक निवडून आले नाहीत. त्यामुळं काँग्रेसला खरोखरंच वंचितचा फायदा झाला का? यावर मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या.
यावर बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, वंचितसोबत आघाडी केल्याचा आम्हाला बिल्कुल फायदा झाला. असं तुम्हाला वाटतं की, आम्ही सोबत दिसलोच नाही. पण ग्राऊंड लेव्हलला तुम्ही पाहिलंच नाही. तुम्ही जर बघितलं असतं तर तुम्हाला हे कळलं असतं. पण आता ही आघाडी पुढेही अशीच कायम राहील निवडणूक संपली म्हणजे आघाडी संपली असं होणार नाही.
दरम्यान, वंचितकडून आरोप केला जात आहे की काँग्रेसनं आमचं काम केलं नाही. प्रचारात काँग्रेस दिसली नाही, आमचे नगरसेवक काँग्रेसमुळं निवडून आले नाहीत. यावर गायकवाड म्हणाल्या, "कदाचित त्यांना माहिती नसावं पण आमच्या कार्यकर्त्यांनी वंचितचं काम केलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसचं काम केलं आहे. आघाडीत एखादा कार्यकर्ता नाराज होऊ शकतो, पण एखादा कार्यकर्ता नाराज असला म्हणून पक्ष काम करत नाही असं नाही. पक्षानं काम केलं आम्ही ज्यांसोबत राहिलो त्यांच्यासोबत कायम इमाने इतबाहेर काम केलं. लोकसभेच्यावेळी देखील आम्ही इमानेइतबारे काम केलं. विधानसभेला पण केवळ काँग्रेस पक्षानंच इमाने-इतबारे काम केलं आहे"
ठाकरे बंधू सोबत नव्हते पण वंचितला काँग्रेसनं सोबत घेतलं. ज्यांनी महाविकास आघाडीला मदत केली होती अशा काही नागरी संघटनांनी आरोप केला आहे की, जवळपास ३० जागांवर काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान झालं आहे. पण यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, पक्षानं घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांना आणि संघटनेला विचारुन घेतला जातो. हा कोणाचाही वैयक्तिक निर्णय नसतो त्यामुळं पक्ष संघटनेनं जेव्हा निर्णय घेतलेला असतो तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.