महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन; वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगर पालिकेसाठी काँग्रेसने कोअर कमिटी स्थापन केली आहे
Varsha Gaikwad, Pimpri-Chinchwad
Varsha Gaikwad, Pimpri-Chinchwadsarkarnama

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने (Congress) प्रथमच कोअर कमिटी काल (ता.१३) स्थापन केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याबाबत वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. या कमिटीच्या अध्यक्षा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी संजय राठोड हे मुख्य समन्वयक आहेत.

कॉंग्रेसने केलेल्या विकासकामांची यादी ही कमिटी जनतेसमोर ठेवणार आहे. पण, गेल्या आठ वर्षापासून पक्ष केंद्रात सत्तेत नाही, तर राज्यतही तो २०१४ ते २०१९ असा पाच वर्षे सत्तेबाहेर होता. २०१९ ला पक्ष इतर दोन पक्षांबरोबर राज्यात सत्तेत आला आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेली वीस वर्षे तो सत्तेबाहेरच आहे. गत टर्ममध्ये, तर त्यांचा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. मग, कॉंग्रेसची कधीची व कुठली विकासकामे ही समिती जनतेसमोर मांडणार हा प्रश्न उभा राहिला आहे.

Varsha Gaikwad, Pimpri-Chinchwad
औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, `मोदी है तो मुमकीन है`..

दरम्यान, या कमिटीत विद्यमान शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे विरोधक गणले जाणारे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांच्यासारख्यांना सदस्य म्हणून संधी दिल्याने कदम यांच्यावर निवडणुकीत अंकुश ठेवण्यात आल्याची चर्चा ऐकू आली. शहराचे दोन वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढरकर आणि अनिरुद्ध कांबळे तसचे कदम यांच्यासह त्यांचे समर्थक पक्षाचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे हे कमिटीचे इतर सदस्य आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आदेशानुसार ती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांचे पॅनेल करणे, शहरात पक्षबांधणी करणे, विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे, गत सत्ताधारी भाजपच्या गैरकारभाराची माहिती जनआंदोलनातून उघड करणे ही कामे कमिटी करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस (प्रशासन व संघटन) देवानंद पवार यांनी यासंदर्भातीलआदेशपत्रात म्हटले आहे.

Varsha Gaikwad, Pimpri-Chinchwad
शरद पवार हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? : ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत घेतली भेट

दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयावर थेट भाष्य करणे कदम यांनी टाळले. गेल्या सहा महिन्यात आपल्या कारकिर्दीत पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा उर्जितावस्था आली असून पक्षाचे शहरातील पूर्वीचे सोन्याचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन, मात्र त्यांनी यानिमित्ताने पुन्हा केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com