Ravindra Dhangekar: आमदार रविंद्र धंगेकरांचे शिंदे सरकारला अल्टिमेटम; तोडगा काढा अन्यथा...

Congress MLA Ravindra Dhangekar on mpsc student protest: विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून देखील सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. लवकर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
Ravindra Dhangekar on mpsc student protest
Ravindra Dhangekar on mpsc student protestSarkarnama
Published on
Updated on

Congress MLA Ravindra Dhangekar on mpsc student protest: हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून देखील सरकारने त्यांची योग्य ती दखल घेतलेली नाही. सरकारने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Pune News : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. कृषी विभागाच्या जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

त्यामुळे तातडीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विद्यार्थीहिताचा निर्णय सरकारने घेतला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर भेट दिली.त्यांना पाठिंबा दिला. या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी आपल्या सोबत आहे, असा शब्दही धंगेकर यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिला. सरकारने विद्यार्थ्यांची मागणी त्वरित मान्य करावी, अशी विनंती सरकारकडे केली. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिली.

Ravindra Dhangekar on mpsc student protest
Pune Porsche Accident Case: पोलिसांनी न्यायालयात सादर केली 'एका गुन्ह्याची गोष्ट': दोषारोपपत्रात पाचशे फोटोंचा 'अल्बम'

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या परीक्षा असल्याने या विद्यार्थ्यांपुढे पेच प्रसंग निर्माण झाला आहे. वास्तविक, सरकारने ही सर्व पडताळणी करूनच परीक्षेच्या तारखा जाहीर करायला पाहिजे होत्या. परंतु या गोष्टींमध्ये मुळातच सरकारला रस नसल्याने केवळ निवडणुका त्यांच्या डोळ्यासमोर असतात.

हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून देखील सरकारने त्यांची योग्य ती दखल घेतलेली नाही. सरकारने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Ravindra Dhangekar on mpsc student protest
Kolhapur Politics : फडणवीस-पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात कसोटी, मेळाव्यात नाराजांची उपस्थिती ठरवणार महायुतीचं भवितव्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आयोगाशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. त्यांनतर ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टि्वच करुन सरकारला अल्टिमेटम दिले आहे. विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com