Harshvardhan Sapkal : 'ज्या वास्तुत कार्यकर्ता म्हणून झोपलो तेथेच प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो...', सपकाळांनी 'तो' किस्सा सांगितला

Harshvardhan Sapkal Shares His Journey : आपले विषय लोकांना अपील होत आहेत. आपण जे बोलत आहोत ते विषय लोकांपर्यंत पोहोचत आहेत. लोक ते विषय ऐकु इच्छितात. आत्ता आप अ‍ॅक्शन घेतली पाहिजे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkalsarkarnama
Published on
Updated on

Harshvardhan Sapkal News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी (ता.22) पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा संदेश देत येथून पुढे आपल्या वाटचालीचा एक पाय संघटनेचा आणि दुसरा पाय विचारधारा असेल, असे स्पष्ट केले. सपकाळ यांनी काँग्रेस भवनासंदर्भातील एका किस्सा देखील सांगितला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मी या वास्तुमध्ये (काँग्रस भवन) 2006-2007 ला शिबिरासाठी आलो आहे. ज्या हाॅलमध्ये मी बोलतोय त्याच हाॅलमध्ये मुक्कामी होतो. दोन दिवस सत्र चालवण्याची जबाबादारी माझ्यावर होती. काँग्रेसचा एक कार्यकर्ता या कार्यालयमध्ये झोपतो, मुक्कामी राहतो तो प्रांतध्यक्ष म्हणून येतो हा आनंद आपल्यासमोर शेअर करतो.

Harshvardhan Sapkal
Nagpur Riots Update : फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का? ठाकरेंचा सरकारवर निशाणा

आपले विषय लोकांना अपील होत आहेत. आपण जे बोलत आहोत ते विषय लोकांपर्यंत पोहोचत आहेत. लोक ते विषय ऐकु इच्छितात. आत्ता आप अ‍ॅक्शन घेतली पाहिजे. ग्राऊंड लेवला जाऊन काम केलं पाहिजे, लोकांच्या समस्या ऐकुण घेतल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाहिजे. लोकांमध्ये गेलं पाहिजे. आपल्याला पुढची वाटचाल ही एक पाय संघटनेचा आणि एक पाय विचारधारेचा या दोन पायांवर करायची आहे, असे सपकाळ म्हणाले.

आपल्याला प्रामाणिकपणाच्या रस्त्याने चालायचे आहे. या रस्त्याने गेले वाचून आपल्यापुढे दुसरा मार्ग नाही. आपला जो मार्ग तो खडतर स्वरुपाचा आहे. आणि त्यात खडतर मार्गावरून आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सांस्कृतिक विचारांची लढाई लढाईची आहे, असा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना दिला.

घरात एकमत बाजारात पत...

सपकाळ म्हणाले, घरात एकमत आणि बाजारात पत असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. काँग्रेसची बाजारात पत आहे. आपण संकटाच्या वेळी एकत्र असू तर आपली ताकद जास्त असेल. कार्यालयात झोपणारा माणूस एक दिवस प्रांताध्यक्ष होतो, मी कार्यकर्ता आहे, बूथ एजंट म्हणून राहिलेला कार्यकर्ता आहे.

रवींद्र धंगेकरांना टोला

काँग्रेसमधून दोन वेळेस विधानसभा तर एक वेळेस लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्या नंतर देखील रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र धंगेकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. ते म्हणाले 'जिधर बम उधर हम', या संस्कृतीचा आपण धिक्कार केला पाहिजे.

Harshvardhan Sapkal
MLA Sanjay Kenekar Rally News : 'गिले शिकवे छोड़ के'.. संजय केनेकर यांचे जल्लोषात स्वागत; सावे, कराड, बोराळकर सगळेच मिरवणुकीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com