Congress Politics : बंडखोरांविरोधात काँग्रेस आक्रमक; आबा बागुल, विशाल पाटलांवर कारवाई करणार

Atul Londhe On Vishal Patil And Aba Bagul : सांगलीतून विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुण्यातून आबा बागुल यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात थेट भूमिका घेतली आहे. याचा परिणाम महाविकास आघाडीवर होण्याची शक्यता आहे.
VIshal Patil, Aba Bagul
VIshal Patil, Aba BagulSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णयाविरोधात बोलणारे आणि कृती‌ करणारे कोणीही असोत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे Atul Londhe यांनी सांगलीचे विशाल पाटील व पुण्याचे आबा बागुल यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सूचित केले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. सांगलीतून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्या उमेदवारीला काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि लोकसभेसाठी इच्छुक विशाल पाटलांनी तीव्र विरोध केला. आपल्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांसह त्यांनी दोनदा दिल्लीवारी केली. मात्र त्यास यश आले नाही. अखेर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

पुण्यात काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यास माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ पदाधिकारी आबा ऊर्फ उल्हास बागुल Aba Bagul यांनी तीव्र विरोध केला. पक्षातील एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून पक्ष बाहेरून आलेल्या व्यक्तीलाच स्थान देणार का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी धंगेकरांच्या उमेदवारीविरोधात आंदोलन केले होते. त्यास पुणे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना साथ दिली होती. आता काँग्रेसमध्ये नाराज असलेले बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

VIshal Patil, Aba Bagul
Nilam Gorhe : उठा जरा..! नीलम गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेत राजू वाघमारेंना डुलकी अन् पुढे...

सांगली आणि पुण्यात अनुक्रम विशाल पाटील Vishal Patil आणि आबा बागुल यांच्या बंडखोरीचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला बसणार आहे. हे बंड थोपवण्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत, तर रवींद्र धंगेकरांविरोधात बागुलांनी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यातूनच या दोघांवर कारवाई करण्याचे लोंढेंनी संकेत दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

VIshal Patil, Aba Bagul
Vishal Patil Rebel : सांगलीच्या रक्तात बंड; विशाल पाटलांनी काँग्रेस अन् पैलवानाचंही टेन्शन वाढवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com