सांगोल्यात शेकापला धक्का; शिवण्यातील सत्ता गमावली : पाटील-साळुंखे गटाने जिंकल्या चार ग्रामपंचायती

शिवणे येथील सरपंचपदी दादासाहेब घाडगे हे विजयी झाले. त्यांच्या आई कुसुम घाडगे या सदस्यपदी निवडून आले आहेत.
Sangola : Gram Panchayat Election
Sangola : Gram Panchayat Election Sarkarnama
Published on
Updated on

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (Sangola) तालुक्यातील झालेल्या सहा ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) निवडणुकांमध्ये (Election) चार ग्रामपंचायतींवर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) आणि माजी आमदार दीपक साळुंखे गटाने सरपंचपदी वर्चस्व मिळविले. शेतकरी कामगार पक्षाने (PWP) दोन गावांतील गड कायम राखले आहेत. शिवणे ग्रामपंचायतीवर सत्ता मात्र शेकापला गमावावी लागली. (Shahaji Patil and Deepak Salunkhe group won four Gram Panchayats in Sangola)

सांगोला तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. यामध्ये पाचेगाव खुर्द या गावातील निवडणूक या अगोदरच बिनविरोध करण्यात यश आले होते. उर्वरीत पाच ग्रामपंचायतीचे निकाल आज लागले. यामध्ये अनकढाळ व चिंचोली गावात शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. बलवडी, चिणके, शिवणे, पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीवर आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे गटाने वर्चस्व मिळवले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शिवणे ग्रामपंचायतवर आजी-माजी आमदाराच्या गटाने वर्चस्व मिळविण्यात यश मिळवले आहे. गेली अनेक वर्ष शिवणे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. या निवडणुकीत आमदार शहाजी पाटील गटाने शेकापच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

Sangola : Gram Panchayat Election
Gram Panchayat Result: आंबेगावात राष्ट्रवादी पुन्हा....२१ पैकी १७ ग्रामपंचायतींवर वळसे पाटलांचे वर्चस्व!

शिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दादासाहेब जनार्दन घाडगे यांनी १६४५ मते मिळवून विरोधी उमेदवार मारुती जगन्नाथ घोगरे (१३०८) यांचा ३३७ मतांनी पराभव केला. विजयी उमेदवार संजय वलेकर ५१३, रंपाबाई ऐवळे ४४१, सुनिता ईरकर ५३८, नामदेव जानकर ४८७, उदयसिंह घाडगे ५१७, छाया घाडगे ५७९, अंबादास भाटेकर ३७८, सुनिता घाडगे ३७२, कशिलिंग शेळके ३८८, प्रियांका शेळके ३८२, कुसुम घाडगे ४११ मतांनी विजयी झाले आहेत.

Sangola : Gram Panchayat Election
Gram panchayat result updates: परिचारक गटाच्या शिवानंद पाटलांनी गाव राखले; मंगळवेढ्यात समविचारीचा बोलबाला

चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा दत्तू खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी जालिंदर मिसाळ १८७, दिपाली काटे २५५, भीमराव मिसाळ ३४३, दिपाली मिसाळ ३७०, तानाजी कवठेकर ४७४, मोहन मिसाळ ३३३, शांताबाई मिसाळ ४१३, विनायक मिसाळ ३३२, विमल मिसाळ ३७६, तेजस्विनी मिसाळ ३५२, सविता शितोळे ३७९ विजयी झाले आहेत.

Sangola : Gram Panchayat Election
Gram panchayat election result : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

अनकढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली दऱ्याबा बंडगर यांनी ८२४ मते मिळवून विरोधी उमेदवार वर्षा बंडगर (४००) यांचा ४२४ मतांनी पराभव केला. या ठिकाणी शारदा काटे, सुनील अडसूळ, मयुरी अदाटे हे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर सदस्यपदी पांडुरंग पवार ३६५, दिगंबर बंडगर ३८०, शुभांगी बंडगर ३४९, अर्चना उर्फ अंजना बंडगर ३५७, नामदेव बंडगर ३३२, विमल बंडगर ३५६ हे निवडून आले आहेत.

Sangola : Gram Panchayat Election
मोठी बातमी : बालेकिल्ल्यातच फडणवीसांना झटका; दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीची सत्ता

चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय बेहरे यांनी ९६४ मते मिळवून विरोधी उमेदवार लक्ष्मण बेहरे यांचा १५३ मतांनी पराभव केला. तर सदस्यपदी अविनाश सुर्यागण १८१, कलावती गडदे १७४, बाळासो चव्हाण २३७, पमाबाई बेहरे २४४, स्वाती इंगळे २४६, अंकुश खांडेकर ४०८, विठ्ठल घाडगे ४१०, जानकाबाई हजारे ३९९, रामेश्वर शिनगारे ३०१, शोभा माने ३०२, सुमन खरात २७९ हे निवडून आले आहेत.

Sangola : Gram Panchayat Election
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; सात ग्रामपंचायती जिंकल्या

बलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी ११५० मते मिळवून विरोधी उमेदवार तानाजी नामदेव सांगोलकर (९२३) यांचा २२७ मतांनी पराभव केला. तर शिवाजी शिंदे, शारदा धायगुडे, सुनिता तोरणे, समाधान शिंदे, सुरेखा पवार, बाबासाहेब पालसांडे, कृष्णदेव कारंडे, राधाबाई राऊत, नंदा करडे, रविराज शिंदे, मनिषा गुरव यांनी बिनविरोध निवड झाली आहे.

पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता संजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी शिवाजी मिसाळ, रंजना मिसाळ, अर्चना मिसाळ, हणमंत मिसाळ, सविता यादव, युवराज भंडगे, दिपाली नलवडे, भारत मिसाळ, इंदुमती काबुगडे यांची बिनविरोध निवड झाली.

मुलगा सरपंच, तर आई सदस्य

शिवणे येथील सरपंचपदी दादासाहेब घाडगे हे विजयी झाले. त्यांच्या आई कुसुम घाडगे या सदस्यपदी निवडून आले आहेत. त्यामुळे आई व मुलगा एकाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्यपदी निवडून आल्याची घटना घडली आहे.

मिरवणुका नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावात विजय मिरवणूक न काढण्याचे प्रशासनाने आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विजय मिरवणूक न काढण्यासाठी गावात पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. परंतु विजयी उमेदवार घोषित केल्यानंतर विजयी उमेदवार, कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत असल्याचे चित्र दिसून येत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com