Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ प्रतिष्ठानला IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांकडून 12 लाखांची देणगी दिल्याचे तसेच पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने दिलीप खेडकर यांनी मोहटा देवीला चांदीचा मुकूट अर्पण केल्याचे वृत्त टीव्ही मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिष्ठानसाठी कोणत्याही व्यक्तीकडून देणगी स्वीकारत नाही. प्रतिष्ठाणकडे खेडकर कुटुंबाचा कुठलाही चेक जमा झालेला नाही. चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. या विषयी आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे खेडकर कुटुंबाशी संबंध असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर ट्विट करत पंकजा मुंडे यांनी थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
विधान परिषदेच्या निकालानंतर दोन दिवस आनंद साजरा करत असताना अचानक आपली बदमानी करणाऱ्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, खुप आधीपासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याशी संबंधित बातम्या येत होत्या. मात्र, अचानक माझे नाव त्यात घेतले गेले. विधान परिषदेच्या निकालानंतर आनंद साजरा करत असताना जाणीवपूर्वक अशा बातम्या दिल्या गेल्या. कोणीतरी येतो माहिती देतो म्हणून शहानिशा करता अशा पद्धतीने बातम्या करणं योग्य नाही. माध्यमांनी विश्वासार्हता जपायला हवी. मी यावर आता कायदेशीर पाऊल उचलणार आहे, असा मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी तब्बल 12 लाख रूपयांची देणगी दिल्याचे चेकचा फोटो, पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट दिला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचे पंकजा मुंडे यांनीच स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.