IAS Pooja Khedkar : वादात सापडलेल्या 'ओम दीप' बंगल्याला कुलूप अन् तेही 'सिंहा'चं! गेल्या मनोरमा खेडकर कुठे?

Manorama Khedkar Bunglow In Baner : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्यांनी आपल्याबाबत मीडिया ट्रायल होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आपल्या निर्दोषत्वावरही भाष्य केलं आहे .
Manorama Khedkar.jpg
Manorama Khedkar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पूजा यांच्यासह त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यापाठीमागेही चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्या अद्याप पुणे पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत. पुणे महापालिकेने त्यांच्या बाणेर येथील बंगल्याला नोटिस लावल्यानंतर आता त्यांच्या बंगल्याला भलं मोठं कुलूप लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

खेडकर यांच्या बंगल्याला कुलूप नेमकं कोणी लावलं आहे यावरुन चर्चांना उधाण आले असतानाच त्याच्यावरचं वाघाचं चित्र येणार्‍या जाणार्‍यांचं लक्ष वेधून घेत आहे. या कुलुपाद्वारे खेडकर कुटुंबियांनी काही संदेश देण्याचा हेतू तर नाही ना अशी चर्चाही जोर धरू लागली आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यांची चौकशी करण्यासाठी पौड पोलिस त्यांच्या राहत्या घरी आले होते.पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले होते. आता मनोरमा खेडकर यांच्या घराला कुलूप लावण्यात आलं आहे.त्यांचा काही दिवसांपूर्वी बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मनोरमा खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यावर सोमवारी (ता.15) सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक धडकलं होतं. पण त्यांना घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर काहीच वेळात खेडकर यांच्या बंगल्याला एक भलं मोठं वाघाचं चित्र असलेलं कुलूप लावण्यात आले आहे. चौकशीसाठी पोलिस येऊन गेल्यानंतर हे कोणी व कधी लावले असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Manorama Khedkar.jpg
CP Amitesh Kumar : चोरांची मोठी मजल! पोलिस आयुक्तांनाही सोडलं नाही; अखेर...

पुणे ग्रामीण पोलिस काय म्हणाले..?

आम्ही मनोरमा खेडकर यांचा शोध घेत आहोत. परंतु,त्यांचे मोबाईल बंद येत आहेत.ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. जो गुन्हा दाखल झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांची चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणी एकूण 7 जणांवर पौड पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नसून त्या सर्वांसह मनोरमा खेडकर यांचाही शोध घेत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Manorama Khedkar.jpg
Sambhajiraje Chhatrapati News : शाहू महाराजांच्या 'त्या' पत्रावर संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका,म्हणाले,'माझ्या स्वार्थासाठी...'

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्यांनी आपल्याबाबत मीडिया ट्रायल होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.तसेच आपल्या निर्दोषत्वावरही भाष्य केलं आहे .

पूजा म्हणाल्या, भारतीय संविधानानुसार दोषी सिध्द होईपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष असते. मीडिया ट्रायलमधून मला दोषी ठरवले जात असून ते चुकीचे आहे. प्रत्येकाचा हा मुलभूत अधिकार आहे की, दोषत्व सिध्द होईपर्यंत तो निर्दोष असतो. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर मला असे दोषी धरणे, हे बरोबर नाही, असे खेडकर यांनी स्पष्ट केले.

समितीसमोर मी माझे म्हणणे मांडेन. समिती जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य करावा लागेल. सध्या सुरू असलेल्या चौकशीवर बोलण्याचा मला अधिकार नाही. नंतर ते सर्वांसमोरच येईल, पण आता मी काहीच बोलू शकत नाही, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले. खेडकर यांनी यूपीएससीकडे सादर केले दिव्यांगत्व व क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

Manorama Khedkar.jpg
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : आरक्षणासाठी शरद पवारांना भेटलेल्या भुजबळांची जरांगेंनी पुन्हा शाळा घेतली; नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com