Pooja Khedkar and Center Committee : पूजा खेडेकर यांच्यावरील आरोपांचा तपास करण्यासाठी केंद्राकडून विशेष समितीची स्थापना!

Trainee IAS Officer Pooja Khedkar News : समिती पुढील दोन आठवड्यात संपूर्ण बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. त्या अहवाला नंतरच वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडेकर यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकार काय कारवाई करणार हे निश्चित होणार आहे.
pooja khedkar
pooja khedkarsarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar Case Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून बदली करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडेकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा तपास केला जाणार आहे. यासाठी आता एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यात ही समिती आपला अहवाल देणार आहे.

वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर(Pooja Khedkar) यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती त्यांच्या कुटुंबाकडे असतानाही पूजा यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसी मधून काढल्याचा आरोप केला जात आहे.

तसेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर केली होती. त्याआधारे त्यांनी परिक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे.

pooja khedkar
Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी पाठवले समजपत्र!

त्यांनी ही सवलत घेतली नसती तर त्यांची आयएएस साठी निवड देखील झाली नसती. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून युपीएससीची परीक्षा दिल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहे. त्या आयएएस कशा झाल्या याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात होती. पूजा खेडेकर यांच्याबाबत होत असलेल्या आरोपांची थेट दखल दिल्लीत घेण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती मागविली आहे.

pooja khedkar
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ, थेट दिल्लीतून होणार कारवाई

विविध फायद्यांचा लाभ घेणाऱ्या पूजा खेडेकर यांच्या स्वतः च्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले होते. आपल्या खासगी वाहनावर बेकायदा पद्धतीने लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी अक्षरे लिहिलेल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना समजपत्र ही बजावले आहे. आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडेकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे.

pooja khedkar
Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सॉरी...

केंद्र सरकारकडून अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील दोन आठवड्यात संपूर्ण बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. त्या अहवाला नंतरच वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडेकर यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकार काय कारवाई करणार हे निश्चित होणार आहे. पूजा यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबतची पडताळणी ही समिती करणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com