Darshana Pawar Death Case : लग्नाला नकार दिल्यामुळे दर्शना पवारची हत्या; पोलिसांनी केला खुलासा!

Darshana Pawar Death Case Update : पोलिस अधीक्षकांची पत्रकार परिषेदेत खुलासा..
Darshana Pawar Death Case Update
Darshana Pawar Death Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

Darshana Pawar Death Case Update : दर्शना पवार हत्या प्रकरणामध्ये आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. (Darshana Pawar Death Case Update )

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली होती. दर्शना राजगडावर गेली तेव्हा तिच्यासोबत आरोपी राहुल हंडोरे होते. मात्र गडावरून परतताना राहुल एकटाच होता. दर्शनाचा मृतदेह आढलल्यापासून आरोपी राहुल हा फरार होता. पुणे ग्रामीण पोलीस दलाची पाच पथके राहुलचा शोध घेत होते. अखेर राहुल हंडोरे (Rahul Handore) याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. (Pune News)

दर्शनाची पवारची हत्या राहुल हंडोरेनेच केली हे पोलीस तपासाकत स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आरोपी राहुल हंडोर पोलीसांना गुंगारा देत फरार होत होता. देशातील अनेक राज्यातून तो फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिुम बंगाल, हरियाणा इथे तो फिरत होता. पुणे ग्रामीण पोलीसाचीपाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आले आहे. अटक केल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी यासंदर्भात आता पत्रकार परिषद घऊन याबाबत अधिक माहिती दिली आहे.

पोलीस अधिक्षक अंकीत गोयल म्हणाले, दर्शना पवार हिचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर आम्हाला तिच्या शरिरावर काही खुणा आढळून आल्यामुळे याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिस्थितीजन्य पुरावे आढळल्यामुळे आरोप निश्चित केले आहेत. आरोपी राहुल हंडोरेच्या मागावर ग्रामीण पोलिसाचे पाच पथके मागावर होते. त्यानुसार मुंबईतून आरोपील अटक केली आहे. आम्ही आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

आरोपी हा पुण्यात राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करत होता. याआधीही त्याने परिक्षा दिली होती. दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरे हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. आरोपी हा दर्शनाच्या घरच्यांशीही या आधी परिचयात होता. आरोपी राहुल हंडोरेला दर्शनाने लग्नाला नकार दिल्यामुळे हा खून केला असावा, अशी आमची प्राथमिक माहिती आहे. आज आम्ही आरोपील कोर्टात हजर करणार आहोत, पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com