Dattatray Bharane : भरणेंच्या नाराजीची चर्चा वाढली; मंत्रिपदाचा पद्‌भार स्वीकारला नाही...आता कॅबिनेट बैठकीलाच दांडी!

Mahayuti Government Cabinet Meeting : खाते वाटपात भरणे यांच्या वाट्याला कमी महत्वाचे मानले जात असलेल्या क्रीडा, युवक आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालय आले आहे. भरणे यांना मात्र मोठ्या खात्याची अपेक्षा होती. मात्र, ते न मिळाल्याने भरणे हे नाराज असल्याची चर्चा आहे.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Pune, 02 January : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झालेले इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी अद्याप आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आज झालेल्या कॅबिनेट बैठकीलाही ते गैरहजर होते. त्यामुळे भरणे यांच्या नाराजीची चर्चा वाढू लागली आहे. विशेष म्हणजे त्या आपल्या मतदारसंघात होते, मात्र कॅबिनेटला गेले नाहीत, हे विशेष.

इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असलेल्या भरणे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. यापूर्वी हे राज्यमंत्री होते. अजितदादांनी आता त्यांना थेट कॅबिनेटमध्ये संधी दिली आहे.

दरम्यान, खाते वाटपात भरणे यांच्या वाट्याला कमी महत्वाचे मानले जात असलेल्या क्रीडा, युवक आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालय आले आहे. भरणे यांना मात्र मोठ्या खात्याची अपेक्षा होती. मात्र, ते न मिळाल्याने भरणे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. खाते वाटप होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप भरणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही.

Dattatray Bharane
Konkan Politic's : राजापुरात काहींनी विरोधकांना मदत करून शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित केली; राजन साळवींचा रोख कोणाकडे?

मंत्रिपदाची कार्यभार न स्वीकारल्यामुळे भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती, त्यात भरणे यांनी आज थेट कॅबिनेट बैठकीलाच दांडी मारली आहे, त्यामुळे भरणेंच्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. आता भरणे हे खरंच कमी महत्वाचे खाते मिळाल्यामुळे नाराज आहेत की दुसऱ्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहण्याचे कारण स्वतः मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, इंदापूर मतदारसंघातील एका कार्यकर्त्याच्या घरातील लग्नामुळे मी आज कॅबिनेट बैठकीला गेलो नाही. या सर्वसामन्य जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आमदार आहे. मला कार्यकर्ता महत्वाचा आहे.

Dattatray Bharane
Vidharbh Politics : पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात; बड्या नेत्याच्या मुलासह समर्थकही अजितदादांच्या संपर्कात...

कॅबिनेट बैठकीचा निरोप आज उशिरा आला. माझ्या मंत्रालयाच्या संबंधित विषय आजच्या कॅबिनेट बैठकीला नव्हते, त्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित नव्हतो. माझ्या मंत्रालयाच्या संदर्भात विषय असते तर मी शंभर टक्के बैठकीला उपस्थित राहिलो असतो. मला पहिल्यापासून सवय आहे. माझ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील लग्नाला जायचं माझ्याकडून राहिलं तर मला रात्री झोपताना त्रास होतो, असेही भरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com