Loan Waiver : मोठी बातमी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितला कर्जमाफीचा मुहूर्त; म्हणाले, 'एप्रिलमध्ये प्रस्ताव अन्....'

Loan Waiver Dattatray Bharane : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत मोठे वक्तव्य केले असून कर्जमाफीचा मुहूर्त सांगतिला आहे.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे प्रस्तावच आला नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानंतर विरोधकांनी राज्य शासनाला चांगलेच घेरले आहे. आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसेच राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी कधी होणार याचा मुहूर्त देखील सांगितला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, जून ते ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांना अतिवृतीचा फटका बसला आहे. आणि क्षेत्राचा विचार केला तर 1 कोटी तीन लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले.यानंतर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात आली आहे .मात्र अतिवृष्टी बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला नाही असे केंद्रीय कृषिमंत्रीनी वक्तव्य केले होते. मात्र तो प्रस्ताव मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवला आहे.

केंद्र सरकारकडे अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे त्यादृष्टीने मदत पुनर्वसन मार्फत प्रस्ताव पाठवला आहे.मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत आलेली नसली तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यास थांबवलं नाही. राज्य सरकारने जाहीर केले रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे.

Dattatray Bharane
BJP Politics : नगरपरिषदेत गोंधळ तरीही महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला युती नको...

केंद्रीय मंत्री अधिवेशनमध्ये असतील त्यामुळे त्यांच्याकडे प्रस्ताव गेला नसावा मात्र केंद्रीय कृषिमंत्री खोट बोलले नाहीत. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असून तो खाली कुठेतरी असेल तो त्यांना भेटेल. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत येईल या खात्रीवर शेतकऱ्यांना मदत करत असून आत्तापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून 9 हजार 801कोटी मदत शेतकऱ्यांना पोहचली आहे.

जूनमध्ये कर्जमाफी

शेतकरी कर्जमाफी बाबत बोलताना कृषिमंत्री म्हणाले, परदेशीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शेतकरी कर्जमाफी बाबत नेमली आहे. त्यामध्ये बच्चू कडू यांच्यासह शेतकरी संघटना यातील काही जण आहेत. याबाबतचा अहवाल एप्रिलमध्ये येणार असून त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ चर्चा करतील आणि त्यानंतर 30 जुनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती भरणे यांनी दिली.

Dattatray Bharane
Bhaskar Jadhav : मतदान होताच भास्कर जाधवांनी सरकारलं घेरलं? विरोधी पक्षनेतेपद, अधिवेशनासह विविध मुद्द्यांना हातच घातला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com