PDCC Bank Election : भरणे, थोपटे,वळसे पाटलांसह ७ आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला; ऐन दिवाळीत रंगणार 'रणसंग्राम'!

Dattatray Bharne Dilip Walse Patil : तब्बल 30 वर्षाहून अधिक काळ पुणे जिल्हा सहकार बँकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या नेत्यांची यंदा कसोटी लागणार आहे. दिवाळीमध्ये बँकेची निवडणूक पार पडणार आहे.
Dattatray Bharne, Dilip Walse Patil and Sangram Thopte are in focus as political groups gear up for the PDCC Bank election.
Dattatray Bharne, Dilip Walse Patil and Sangram Thopte are in focus as political groups gear up for the PDCC Bank election.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत सत्तासंघर्षाचा मोठा राजकीय संग्राम पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय सत्ताकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या बँकेत तब्बल 7 आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ बँकेच्या संचालक मंडळावर आपले स्थान कायम ठेवणाऱ्या प्रस्थापितांनी पुन्हा एकदा बँकेवर पकड घट्ट करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बँकेच्या राजकारणात दीर्घकाळापासून वर्चस्व असलेल्या नेत्यांनी आपले गड राखण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे, दिलीप मोहिते, रेवणनाथ दारवटकर, आप्पासाहेब जगदाळे आणि रमेश थोरात यांनी बँकेत आपले स्थान तब्बल ३० वर्षे कायम ठेवले आहे. तसेच माजी आमदार संजय जगताप यांच्या घराण्यातही बँकेचे संचालक पद नेहमीच राहिले असून, या दिग्गजांनी नेहमीच स्थानिक राजकारणापेक्षा बँकेच्या राजकारणाला पसंती दिली आहे.

त्यामुळे या सर्वच दिग्गजांनी आपल्यासाठी पूरक असे जास्तीत जास्त ठराव स्थानिक सोसायटीमध्ये करण्यासाठी गावागावात फिल्डिंग लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. यातून मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष आणि आर्थिक देवाण-घेवाण देखील होत आपल्या चर्चा राजकीय वर्ग सुरू आहेत.

Dattatray Bharne, Dilip Walse Patil and Sangram Thopte are in focus as political groups gear up for the PDCC Bank election.
Maharashtra Cabinet Decision: साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन; शेतकरी, पोलिसांना दिलासा, मंत्रिमंडळाचे 7 महत्वपूर्ण निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या गडावरती आता भाजपने देखील लक्ष केंद्रित केला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात मित्रपक्ष असलेल्या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष ऐन दिवाळीत पाहायला मिळणार आहे.

आकडेवारी आणि निवडणुकीची रचना

एकूण मतदार: ९ हजार २१६ मतदार

संस्था सभासद: ७,५१७ आणि व्यक्ती सभासद: १,६९९

संचालक मंडळ: एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

गट रचना: 'अ' वर्ग तालुका गट (१३ जागा), 'ब' वर्ग (१ जागा), 'क' वर्ग (१ जागा), 'ड' वर्ग (१ जागा) आणि विविध राखीव प्रतिनिधी (५ जागा).

Dattatray Bharne, Dilip Walse Patil and Sangram Thopte are in focus as political groups gear up for the PDCC Bank election.
PDCC Bank Election : एका ठरावाला 1 लाख? PDCC बँकेच्या निवडणुकीत 'भाव' फुटला; राष्ट्रवादीचा गड की भाजपचा सर्जिकल स्ट्राइक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com