Daund Firing : दौंडमधील कला केंद्र गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; सत्ताधारी आमदाराचा भाऊच 'रंगेल अन् छंदिष्ट'?

Daund Firing : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रातील गोळीबार प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर पोलिसांनीही या घटनेच्या चौकशीचा वेग वाढवला आहे.
Firing at a reputed art centre in Chouphula, Daund leaves a dancer injured; alleged shooter reportedly linked to a local MLA.
Firing at a reputed art centre in Chouphula, Daund leaves a dancer injured; alleged shooter reportedly linked to a local MLA.Sarkarnama
Published on
Updated on

Daund Firing : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रातील गोळीबार प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर पोलिसांनीही या घटनेच्या चौकशीचा वेग वाढवला आहे. सध्या न्यू अंबिका कला केंद्रात हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांच्यासह 6 महिलांना ताब्यात घेतले आहे.

आज (बुधवार) दुपारी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी चौफुला येथे भेट देऊन येथील तिन्ही कला केंद्रांची चौकशी केली. यात न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याचे उघड झाले. प्राथमिक माहितीनुसार आवडीच्या लावणीवरून हा गोळीबार झाला असावा. मात्र अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत संपूर्ण महिती देणार आहे.

एवढा 'रंगेल अन् छंदिष्ट' भाऊ कोणत्या आमदाराचा?

आज दुपारपर्यंत हा गोळीबार जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील एका आमदाराच्या भावाच्या मित्राने केल्याचे बोलले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी हा गोळीबार आमदाराच्या भावाने केला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता एवढा रंगेल आणि छंदिष्ट भाऊ कोणत्या आमदाराचा आहे असा सवाल विचारला जात आहे.

Firing at a reputed art centre in Chouphula, Daund leaves a dancer injured; alleged shooter reportedly linked to a local MLA.
Daund firing News : दौंडच्या कला केंद्रात गोळीबार : आवडीच्या लावणीवरून 2 गटात राडा, सत्ताधारी आमदाराशी संबंधित व्यक्तीचा समावेश?

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चौफुला परिसरात 3 कला केंद्र आहेत. यातील न्यू अंबिका आणि अंबिका कला केंद्र ही दोन्ही एकाच मालकाची आहेत. यात गाणी, नृत्य, लावणी अशा कला इथे सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे तिन्ही कला केंद्रांमध्ये कार्यक्रम सुरु होते.

मात्र दोन गटांमध्ये आवडीची लावणी सादर करायला लावण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच गोळीबार झाला असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी 2 वाजल्यापासून तपास सुरू केला. सुरुवातीला तिन्ही कलाकेंद्र मालकांनी कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरु केला.

Firing at a reputed art centre in Chouphula, Daund leaves a dancer injured; alleged shooter reportedly linked to a local MLA.
NCP ministers trouble : : काँग्रेससोबत असो की भाजपसोबत... राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतयं?

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कलेच्या नावाखाली या केंद्रांमध्ये अनेक बिभत्स प्रकार सुरु असतात. मद्यपान करुन रात्री-अपरात्रीपर्यंत धिंगाणा सुरु असतो. आपल्या आवडीचे नृत्य सादर करायला लावणे, पैसे उधळणे सुरु असते. अनेक बडे लोक इथे येतात, यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी, गुन्हेगार, उद्योजकांचा समावेश असतो. पोलीस मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com