Daund News : पक्ष संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी; शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत पासलकरांचा गंभीर आरोप!

Mahesh Pasalkar : पक्षवाढीसाठी झटणाऱ्यांचं खच्चीकरण, नेतृत्वाकडून मुस्कटदाबी : जिल्हाप्रमुखांचा गंभीर आरोप..
Daund News : Mahesh Pasalkar
Daund News : Mahesh PasalkarSarkarnama

केडगाव (Daund News ) : शिवसेनेचे ( उध्दव ठाकरे गट ) जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पासलकर यांनी स्वपक्षातील वरिष्ठांनी शिवसेना संपवायची सुपारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्याचा आरोप केला आहे. सध्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. असेही पासलकर यांनी स्पष्ट केले आहे.

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतत दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. ही बाब पासलकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या कानावर घातली परंतू त्यांनी त्यास महत्व दिले नाही. याउलट पासलकर यांचा विरोध असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची दौंड तालुक्यात जाहीर सभा होत आहे. शिवसेनेत आपल्याला डावलले जात असल्याच्या कारणाने पासलकर यांनी राजीनामा दिला आहे. दौंडमध्ये माझी सभा होणार नाही, असे राऊत यांनी पासलकर यांना सांगितले तर माजी आमदार रमेश थोरात यांना सभा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. या सभेबाबत राऊत यांनी मला तोंडावर पाडले आहे अशा तक्रारी पासलकर यांनी केल्या आहेत.

Daund News : Mahesh Pasalkar
Bhor Bazar Samiti : भोरमध्ये सर्वपक्षीय एकत्र येतात, तेव्हा काँग्रेसचा पराभव होतो : राष्ट्रवादीच्या नेत्याने डागली तोफ

याबाबत पासलकर म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मुंबईत १९९४ पासून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. पक्षाने अंधेरी उपशाखा प्रमुखपद दिले. शिवसेनेचे विचार जनमानसात पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे करत आलो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या शब्दानुसार शिवसेना ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी मुंबई सोडून गावाकडची वाट धरली. त्या अनुशंगाने चौफुला ( ता.दौंड ) येथे शिवसेनेचे अद्यावत असे कार्यालय उभे केले. स्वताःचे घरी न जाता त्या कार्यालयात मुक्कामी राहून जनतेची कामे केली. माझ्या कामांची दखल घेत पक्षाने मला जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचे शिवसेनेत प्रवेश घेतले. सध्याच्या काळात अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, मंत्री पक्षास सोडून गेले समोरून आम्हाला पण अनेक प्रलोभने दाखवली गेली पंरतू, आम्ही कधीही तसा विचार केला नाही.

Daund News : Mahesh Pasalkar
Shambhuraj Desai :...अन् शंभूराज देसाईंनी सपत्नीक फुगडी खेळत धरला विठ्ठल नामाचा ठेका

सध्या शिवसेनेतील काही वरिष्ठांनी पक्ष संपवायची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे, त्यानुसार पक्षवाढीचे काम करणा-यांचे खच्चीकरण केले जात आहे. या बाबत पक्षाच्या वरिष्ठांना वेळोवेळी कल्पना दिली, परंतू त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुस्कटदाबीला कंटाळून आपण पदाचा राजीनामा देत आहे. असे पासलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पासलकरांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला?

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) बाजार समिती निवडणुकीत एकही जागा दिली नाही. कार्यकर्त्यांनी ही तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कानावर घातली, परिणामी राऊत यांनी दौंडमधील २६ एप्रिल रोजी होणारी सभा रद्द केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दिली होती.

Daund News : Mahesh Pasalkar
Ajit Pawar On Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, '१५ दिवसात सरकार कोसळणार' तर अजित पवार म्हणतात..

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीत जिल्हा प्रमुख पासलकर यांनी एक जागा मागितली होती. मात्र, एकही जागा मिळाली नसल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. राऊत व पासलकर यांच्यात झालेल्या चर्चाही झाली होती, मात्र यातून काही मार्ग न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com