Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे-पाटलांनी अजूनही...', अजित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar On Manoj Jarange Patil: आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण...; अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
DCM Ajit Pawar and Manoj Jarange Patil:
DCM Ajit Pawar and Manoj Jarange Patil: Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हजारो मराठाबांधवांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आंदोलनाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढत आहे. मराठा आंदोलकांचे हे वादळ थोपवण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर उपाययोजना करत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत बारामतीमधून भाष्य केलं आहे.

मनोज जरांगे-पाटील यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी अजूनही थांबावं, ही सरकारची इच्छा आहे. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि भूमिका बजावण्याचा अधिकार असल्याचं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

DCM Ajit Pawar and Manoj Jarange Patil:
Supriya Sule: '...तर हा दिवस आला नसता'; मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

'अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, ही राम भक्तांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न होते, ते आता सत्यात येत आहे. यासाठी दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या, अनेक सरकार बदलंली. शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे काम पूर्णत्वास नेले. उद्या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना राज्यामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्हाला आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही दिवसानंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असं अजित पवार म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने चालले आहेत, याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. ते सतत त्यांच्या संपर्कात होते. आमदार बच्चू कडू व इतरांना दूत म्हणून पाठवून सरकारने आरक्षणासंदर्भात केलेलं काम त्यांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी मुंबईकडे आगे कुछ करू नये, अशी विनंती करण्यात आली. पण मागासवर्ग आयोगाच्या कामासाठी वेळ देणे आवश्यक आहे. मात्र मनोज जरांगे यांनी आपण सरकारला योग्य ते वेळ दिला असून आपण थांबणार नाही, अशी भूमिका घेतली. प्रत्येकाला संविधानाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिलेला असल्याचं अजित पवार म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

DCM Ajit Pawar and Manoj Jarange Patil:
Manoj Jarange Morcha: मनोज जरांगेंच्या पदयात्रेत गोदाकाठच्या 123 गावांची ताकद दिसली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com