Supriya Sule: '...तर हा दिवस आला नसता'; मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : मनोज जरांगे-पाटील हे हजारो मराठाबांधवांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी हजारो मराठाबांधवांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ते मुंबईत उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी लाखोंचा निघालेला जनसमुदाय 26 जानेवारीला मुंबईत पोहचणार आहे. त्यामुळे यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाबाबत भाष्य करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने जर वेळवर सोडवला असता तर हा दिवस राज्य सरकारवर आला नसता, असा टोला सुप्रिया सुळेंनी सरकारला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Pune Congress News : पुण्यातील काँग्रेस नेतेही 'रामभक्ती'वर स्वार; लोकसभा इच्छुकांची 'रामरक्षा'?

दर रविवारी बारामती मतदारसंघामधील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या शहरी भागातील कचरा, रस्ते, वीज, आणि पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण करत असून त्याच अनुषंगाने आज पुण्यातील या भागात आले असल्याचे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सोहळ्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र श्रीराम मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी आमची इच्छा असल्याचं मतही यावेळी खासदार सुळेंनी व्यक्त केलं.

मागील आठवड्यात वर्धा दौऱ्यावर असताना भाजपचे काही कार्यकर्ते मला भेटले. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी श्रीराम मंदिराचे काम पुढील तीन वर्षांनी म्हणजेच 2027 मध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ते काम वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करूयात, असं सुळे म्हणाल्या.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीबाबतही सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, राज्यात आणि देशांमध्ये दडपशाहीचं वातावरण आहे. रेकॉर्ड काढून पाहिलं तर पार्लमेंटमध्ये हे सांगण्यात आलं आहे की 95 टक्के ईडीच्या नोटिसा या फक्त विरोधी पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या विरोधात बोललो अथवा भाषण थोडं धारदार झालं तर नोटीसा येतात, यात आता काही नवीन राहिलं नाही, असं सुळे यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील 36 जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती त्यांनी सांगितली. तसेच पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीचे आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सुळे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने काही अधिकार आपल्याला दिले आहेत. त्यानुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटील यांनी अनेक आठवड्यांपूर्वी सरकारला या आंदोलनाबाबत इशारा दिला होता. आरक्षणाचा प्रश्न जर वेळेत सोडवला असता तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवर आला नसता. आता महाराष्ट्र सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहावं लागेल, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी टीका केली.

(Edited By : Ganesh Thombare)

Supriya Sule
Devendra fadnavis : प्रभू श्रीरामांवर देवेंद्र फडणवीस यांचे गीत, अमृता फडणवीस गायिका...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com