'चांगल्या मुली फक्त नोकरदारांना मिळतात,' असं विधान करुन नव्या वादाचा तोंड फोडणाऱ्या आमदाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली आहे. या विधानाबाबत माफी मागावी, असे त्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना सांगितले आहे.
अजित पवार यांना पाठिंबा देणारे मोर्शी-वरूड आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानं ते दोन दिवसापासून चर्चेत आहेत. त्यांचा विधानाचा विरोधकांनी निषेध केला. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नोकरीवाला, पानटपरी आणि किराणावाला,शेतकरी; अशी विभागणी देवेंद्र भुयार यांनी केली आहे. त्यांना लग्नासाठी कशा मुली मिळतील, यावर भुयार यांनी भाष्य केलं आहे. भुयारांच्या या विधानामुळे त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
अजित पवार यांना आज बारामतीत पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता त्यांनी भुयार यांनी मुलींबाबत असे विधान करणे चुकीचे आहे, असे सांगितले. काल (बुधवारी)रात्री त्यांनी या विधानाबाबत समज देण्यात आली आहे. त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
देवेंद्र भुयार यांचा विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,"देवेंद्र भुयार यांच्यासारख्यांचा वाह्यातपणा हा फक्त महिलांचा अवमान करणार नाही. पण, शेतकऱ्यांची टिंगल उडवण्याचा हा प्रकार आहे. कृषी क्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणे, कृषी क्षेत्राला कमी लेखणे, कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांची अवहेलना करणे, असा हा प्रकार घडलेला आहे."
"महायुतीच्या नेत्यांनी काहीही वाह्यातपणा केला, कितीही हीन पातळीची वक्तव्ये केली, तर आपल्यावर कायद्याचा बडगा उगरला जाणार नाही, असं अभय त्यांना मिळालं आहे," असे टीका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता सुषणा अंधारे यांनी केली आहे.
"चांगली मुलगी तुमच्या-माझ्यासारख्याला नाही, तर नोकरीवाल्याला भेटते. दोननंबरची काळी-सावळी मुलगी पानटपरी आणि किराणा दुकानदाराला मिळते. तीन नंबरचा राहिलेला गाळ शेतकऱ्याच्या मुलाला भेटतो. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काय खरे राहिले नाही."
"जन्माला येणारा मुलगा हेबाळ निघते. माय इल्लू, पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू, असाच सगळा कार्यक्रम आहे," असं भुयार यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.