Bhausaheb Bhoir: अजितदादांनी सरड्यांचे डायनासोर तयार केले; साथ सोडतानाच भाऊसाहेब भोईर बरसले! VIDEO पाहा

Bhausaheb Bhoir Criticized NCP Chief Ajit Pawar: "माझा मालक आता अजित पवार यांचा पक्ष नसून, माझा मालक आता पिंपरी चिंचवड शहरातील जनताच आहे, अशी भूमिका भोईर यांनी घेत अजितदादांची साथ सोडली आहे.
Bhausaheb Bhoir:
Bhausaheb Bhoir:Sarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षांतराचा सपाटा तयार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इन्कमिंग सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मात्र काही ठिकाणी खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे.

अजितदादांचा बालेकिल्ला असलेले पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार (Ajit Pawar)यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे निकटवर्तीय, खंदे समर्थक पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

"माझा मालक आता अजित पवार यांचा पक्ष नसून, माझा मालक आता पिंपरी चिंचवड शहरातील जनताच आहे, अशी भूमिका भोईर यांनी घेत अजितदादांची साथ सोडली आहे.अजित पवारांची साथ सोडताना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी गंभीर टीका केली.

"पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) सरड्यांचे डायनासोर  तयार केले. भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची एक पिढी ही तयार केली," अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

भोईर हे चिंचवडची विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. चार दिवसापूर्वीच त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. तीस वर्षापासून अधिक काळ पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रीय असलेले भोईर यांना आमदारकीच्या तिकीटाने अनेक वैळा चकवा दिला.

Bhausaheb Bhoir:
Pune BJP: भाजपचे नेते भिडले; प्रस्थापितांनी केली इच्छुकांची नाकेबंदी, बैठकीत काय घडले?

आमदार व्हायचंय मला, असे म्हणणाऱ्या भाऊसाहेबांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अनेक वेळा आपली तलवार म्यान केली. आता मात्र त्यांची पक्क ठरवलं आहे, कुठल्याही परिस्थिती चिंचवड विधानसभा लढलायचीच.

आपल्या मागे विविध पक्षांचे 30-40 नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक बडे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. तर दुसरीकडे अजित पवाराच्या राष्ट्रवादीत गळती लागण्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात हे चित्र अधिक स्पष्ट होईल. महायुतीत चिंचवडची जागा भाजपला सुटणार असल्यानं भोईरांनी हा नवा डाव खेळला असल्याचे बोलले जाते. "अजितदादा विकासाच्या दृष्टीने पाहत होते, मात्र इथं शहराची पुरती वाट लागली. साथ सोडताच अशी जहरी टीका भोईरांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com