जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दोन दिवसांवर : पुणे जिल्हा समितीचे कामकाज थंडच

कागदपत्रांमधील त्रुटी लवकर सांगण्यात आल्या नाहीत. त्यात वेळ गेला.
जात वैधता पडताळणी समिती
जात वैधता पडताळणी समितीसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तीन डिसेंबर आहे. मात्र, जात वैधता पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याचे पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असून अनेकांना गुणवत्तेवर मिळालेले प्रवेश गमावण्याची वेळ आली आहे.

जात वैधता पडताळणी समिती
आरोग्य विभाग भरती : पेपर फुटीप्रकरणी औरंगाबादमधून एकाला अटक

अनेकांनी पुरेशा वेळेत फाईल सादर केली आहे. मात्र, कागदपत्रांमधील त्रुटी लवकर सांगण्यात आल्या नाहीत. त्यात वेळ गेला. दरम्यान, दीड-दोन महिन्यापूर्वी पुण्याच्या जात पडताळणी कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांने प्रस्ताव पाण्यात भिजले. त्यामुळे बहुतेकांना पुन्हा प्रस्ताव सादर करावे लागले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. मात्र, गेल्या आठवड्यात जात पडताळणी समितीचे कार्यालय असलेल्या येरवडा परिसरातील या कार्यालयाची वीज खंडीत झाल्याने कामावर पुन्हा परिणाम झाला.त्यामुळे जवळपास आठवडाभर या कार्यालयात हेलपाटे घालणाऱ्या विद्यार्थी-पालकांन लाईट नसल्याचे कारण सांगण्यात येत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन प्रणाली आहे. परंतु मागील आठवड्यात तांत्रिक त्रुटीमुळे जात पडताळणीचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे शैक्षणिक कामकाजासाठी १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याच्या सूचना बार्टीच्या वतीने देण्यात आल्या होत्या. परंतु सध्या ऑनलाइन प्रणालीचा मंदावलेला वेग, समित्यांच्या कामकाजाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

जात वैधता पडताळणी समिती
सातत्याने लोकसंपर्कात राहणारे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळांची अशीही नोंद !

जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास महाविद्यालयाकडून खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्या किंवा खुल्या प्रवर्गातील शुल्क भरा, अशी सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र कमी कालावधीत कसे द्यावे, असाही प्रश्न समित्यांसमोर निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आरक्षित जागांसाठी जात पडताळणीचे अर्ज प्राप्त होत आहेत.राज्य सरकारने या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांना सवलत आणि विद्यार्थ्यांना सक्ती हा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

जात पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर पावतीवर विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनाच का सक्ती करण्यात येत आहे. तसेच, कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र असूनही नियमावर बोट ठेवून कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे

‘बार्टी’ची ऑनलाइन जात पडताळणी प्रणाली पूर्ववत सुरळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तरीही राज्यात कोठे अडचण आल्यास विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com